Delhi Airport Roof Accident : "एअरपोर्टचं छप्पर फाडून..." ; दिल्ली विमानतळ दुर्घटनेबाबत किरण मानेंची मोदींवर टीका, अवतारी महापुरुष म्हणून केला उल्लेख

Kiran Mane Post On Delhi Airport Incident : अभिनेते किरण माने यांनी दिल्ली विमानतळ दुर्घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली.
Kiran Mane
Kiran Mane Esakal
Updated on

Delhi airport Kiran Mane : मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अभिनेते किरण माने (Kiran Mane) त्यांच्या समाजकारण आणि राजकारणावरील पोस्टसमुळे चर्चेत असतात. सध्या सुरू असणारं राजकारण आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या पोस्ट खूप गाजतात.

किरण यांची पोस्ट

किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून त्यात दिल्ली विमानतळावर घडलेल्या दुर्घटनेचा  व्हिडीओ शेअर केला आणि त्याला "प्रभू श्रीराम सुद्धा आता छप्पर फाडके द्यायले लागलेत.

आधी मंदिराचं छप्पर गळती सुरू झाली...

आता जबलपूर एअरपोर्टचं छप्पर फाडून विकास दणकन् खाली आलाय. 

या एअरपोर्टचं उद्घाटनही त्याच अवतारी महापुरूषानं केलं होतं..." असं कॅप्शन दिलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलं. तर अनेकांनी किरण यांच्यावर टीका केली. एका युजरने यावर ही मोदींची गॅरंटी आहे अशी कमेंट केली आहे तर एकाने निकृष्ट बांधकाम केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत सर्व स्तरातून सरकारवर टीका होत आहे.

Kiran Mane
Kiran Mane : 'ते नजरेला नजर देऊ शकले नाहीत' ; मोदी-राहुल यांच्या व्हायरल व्हिडिओवर किरण मानेंची पोस्ट

राम मंदिर गळतीवरही भाष्य

काही दिवसांपूर्वी राम मंदिरात होणाऱ्या गळतीबद्दलही किरण व्यक्त झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर "शेतकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत देश देशोधडीला लागलेला आहेच. पण ज्या गोष्टीवर तुम्ही मतं मागितलीत ते राम मंदिरही तुम्हाला धड बांधता आलेलं नाही. एका पावसात गाभारा गळायला लागला. गाभाऱ्यातून पाणी बाहेर काढायचीही व्यवस्था नाही. लज्जास्पद आणि संतापजनक आहे हे. समस्त हिंदूंचा अपमान आहे. लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या. लायक माणूस खुर्चीवर बसवा. जय श्रीराम" अशी पोस्ट शेअर केली होती. किरण यांची ही पोस्ट चर्चेत होती.

Kiran Mane
Kiran Mane: "राहुल-प्रियांका या दोघांनी आईच्या चेहर्‍यावरचं हरवलेलं हसू परत आणलं"; किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.