Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वेसर्वा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित 'आम्ही जरांगे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.
Manoj Jarange Patil Biopic
Manoj Jarange Patil BiopicEsakal

मराठा आरक्षणाचा संघर्ष अजूनही सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्र्रातील मराठा समाजाला एकवटून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आम्ही जरांगे - गरजवंत मराठयांचा लढा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

गेला शतकभर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला संघर्ष, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी दिलेला लढा याची गोष्ट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

"कर्म मराठा, धर्म मराठा!
मराठ्यांचा नवीन सरदार!

‘आम्ही जरांगे’
गरजवंत मराठ्यांचा लढा!" असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे. १४ जूनला हा बहुप्रतीक्षित सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

ही आहे सिनेमाची कास्ट

या चित्रपटाची संकल्पना डॉ. मधुसूदन मगर यांची असून, या भन्नाट क्रांतिकारी चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.

या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका मकरंद देशपांडे हे साकारणार आहेत. तर या व्यतिरिक्त या सिनेमात मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Manoj Jarange Patil Biopic
Manoj Jarange Movie: आता संघर्ष मोठ्या पडद्यावर.. स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित

या सिनेमाची निर्मिती नारायणा प्रोडक्शनने केली असून या चित्रपटाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, दादा दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत.

सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. याशिवाय मनोज जरंगे यांच्या आयुष्यावर आणखी एक सिनेमा येत असून त्या सिनेमाचं नाव संघर्षयोद्धा असं आहे. त्या सिनेमाची चर्चाही प्रेक्षकांमध्ये खूप आहे.

Manoj Jarange Patil Biopic
Manoj Jarange : राजकारण हा माझा धर्म नाही.. पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com