Sharmila Tagore's Interesting Memory : एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्या बंगाली सिनेइंडस्ट्रीचाही महत्त्वाचा भाग होत्या. नुकतंच एका गाजलेल्या मुलाखतीत बंगाली इंडस्ट्रीतील प्रसिद्ध एका अभिनेत्याने शर्मिला त्यांच्याविषयीचा एक किस्सा शेअर केला.
बंगाली इंडस्ट्रीमधील आघाडीचे अभिनेते प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी नुकतीच सिनेमाच्या प्रोमोशननिमित्ताने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांचा ‘अजोग्यो’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यावेळी प्रोसेनजीत यांनी लहानपणी त्यांनी शर्मिला यांना झापड मारली होती अशी आठवण सांगितली.
प्रोसेनजित हे बंगाली सुपरस्टार बिस्वजीत चॅटर्जी यांचे पुत्र आहेत. लहान असताना प्रोसेनजित वडिलांबरोबर सेटवर जायचे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावेळी घडलेला प्रसंग त्यांनी या मुलाखतीत शेअर केला. ते म्हणाले,"मला वाटतं तेव्हा मी चार-पाच वर्षांचा असेन. हिरो व हिरोईन यांच्यातील भावनिक सीन सुरू होता, त्या सीनमध्ये शर्मिला आंटींनी माझ्या वडिलांना झापड मारली होती. मी ते पाहिलं आणि मला राग आला. पुढे लंच ब्रेकमध्ये शर्मिला आंटींनी मला जवळ बोलवलं. मी तेव्हा त्यांना झापड मारली.
आजही जेव्हा मी शर्मिला टागोर यांना भेटतो तेव्हा त्या मला त्या घटनेची आठवण करून देतात. ‘मी तुझ्या वडिलांना झापड मारली म्हणून तू मला झापड मारली होतीस ना,’ असं त्या हसून म्हणतात."
शर्मिला यांनी आजवर अनेक बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. बिस्वजीत चॅटर्जी यांच्याबरोबर शर्मिला यांनी 'ये रात फिर ना आएगी' आणि 'प्रभातार रंग' या सिनेमात काम केलं होतं. याचबरोबर शर्मिला यांचे 'आराधना','आनंद आश्रम','अमर प्रेम' हे हिंदी आणि 'अपुर प्रेम','देवी','अमानुष' हे सिनेमे गाजले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.