Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक महान कलाकार होऊन गेले. त्यांचा अभिनय, शैली याचे आजही अनेकजण फॅन आहेत. आपल्या दमदार अभिनयाने सगळयांचे मनोरंजन करणारे असेच एक देखणे दिवंगत अभिनेते म्हणजे ऋषी कपूर. अगदी अखेरपर्यंत विविध शैलीच्या भूमिका साकारण्याचा खासियतीमुळे ऋषी यांनी वेगळी ओळख कमावली. पण तुम्हाला माहितीये का ऋषी यांचं सिनेविश्वातील पदार्पण झालं तेव्हा ते फक्त दोन वर्षांचे होते.