Riteish Deshmukh : "सलमान भाऊ सारखा कुणी नाही" ; सलमानशी तुलना करण्यावर रितेशचं सडेतोड उत्तर

Riteish Deshmukh Answer On Salman Khan : अभिनेता रितेश देशमुखने सलमानशी तुलना होण्यावर सडेतोड उत्तर दिलं.
Riteish Deshmukh : "सलमान भाऊ सारखा कुणी नाही" ; सलमानशी तुलना करण्यावर रितेशचं सडेतोड उत्तर
Updated on

Bigg Boss Marathi season 5 : बिग बॉस मराठी ५ ची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी सीजन ५ चा होस्ट रितेश देशमुखने पत्रकाराच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. रितेशने यावेळी सलमानशी होणाऱ्या तुलनेवर सडेतोड उत्तर दिल.

पत्रकार परिषदेवेळी एका पत्रकाराने त्याला सलमान आणि त्याच्या सूत्रसंचालनाची तुलना करणारा प्रश्न विचारला. त्यावेळी रितेशने उत्तर दिलं कि,"अर्थात मी आधीच मी सांगितलं होतं कि, सलमान भाऊ जे करू शकतात ते कुणीच नाही करू शकत आणि अनिल सरांना खूप चांगलं ओळखतो. ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत पण आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे ते त्यांच्या स्टाईलने शो होस्ट करतात. होस्टच हेच काम आहे. जेव्हा तुम्ही कुणाला होस्ट म्हणून निवडतात तेव्हा तो स्वतःची एक स्टाईल घेऊन यावा ही अपेक्षा असते. हे करण्याचा मी सुद्धा प्रयत्न करेन. आणि २-३ आठवड्यातील माझं काम पाहून तुम्ही सांगा कि मला जमत आहे कि नाही."

तर रितेशला घरातील बिग बॉस कोण असाही प्रश्न विचारण्यात आला त्यावर रितेशने उत्तर दिलं कि,"माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो…तो बॉस म्हणजे त्याची बायको. माझी मुलं बिग बॉस बघत नाहीत कारण, त्यांच्यासाठी घरात घडतं तेच बिग बॉस आहे आणि जिनिलीया बद्दल सांगायचं झालं तर, माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात आधी तिलाच सांगतो. तिचं मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मी बिग बॉस करावं ही तिची मनापासून इच्छा होती कारण, आम्ही दोघंही बिग बॉस शोचे खूप मोठे फॅन आहोत."

२८ जुलै २०२४ ला कलर्स मराठी वाहिनी आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिग बॉस मराठी चा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे. अंकिता वालावलकर, हार्दिक जोशी, विवेक सांगळे. चेतन वढनेरे, वर्ष उसगावकर यांच्या नावाची चर्चा बिग बॉस मराठीचे स्पर्धक म्हणून आहे.

Riteish Deshmukh : "सलमान भाऊ सारखा कुणी नाही" ; सलमानशी तुलना करण्यावर रितेशचं सडेतोड उत्तर
Bigg Boss Marathi 5 : रांगडा गडी आणि सगळ्यांचा लाडका यार ! घरात प्रवेश करणार 'हे' कलाकार ; पोस्ट झाली व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.