Shah Rukh Khan & Mukesh Ambani : कोट्यवधींचे मालक असलेल्या मुकेश अंबानी आणि शाहरुख यांनी घेतला ३१ रुपयांच्या ORS ड्रिंकचा आस्वाद ; नेटकरी म्हणाले...

Shah Rukh & Mukesh Ambani at PM oath taking ceremony : काल पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता शाहरुख खानने आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी हजेरी लावली. त्यावेळेचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Shah Rukh Khan & Mukesh Ambani
Shah Rukh Khan & Mukesh Ambani Esakal
Updated on

Mukesh Ambani & Shah Rukh Khan : काल म्हणजे ९ जून २०२४ ला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला अनेक जगभरातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींनी हजेरी लावली.

बॉलिवूडमधून अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होता. तर सुपरस्टार शाहरुख खानने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबरोबर या सोहळ्याला हजेरी लावली. या जोडीने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहरुख खानच्या हातातील ओआरएस ड्रिंकची चर्चा

शपथविधी कार्यक्रमातील मुकेश अंबानी आणि शाहरुख खानचे फोटो व्हायरल झाले असतानाच त्यात शाहरुखच्या हातात असलेल्या निव्वळ ३१ रुपयांच्या ओआरएस ड्रिंकच्या पॅकेटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय आणि या ड्रिंकची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.

शाहरुख आणि अंबानी यांचा हा फोटो चांगलंच व्हायरल झाला असून अनेक युजर्सनी या फोटोवर भन्नाट कमेंट्स केल्या. “हे त्या सोडा ड्रिंकपेक्षा खूप चांगलं आहे आणि या हवामानासाठी योग्य आहे. तसेच शाहरुख खान नुकताच हिट स्ट्रोकमधून बरा झालाय त्यामुळे त्याने काळजी घेणं योग्य आहे.” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर एकाने "बस्स एवढं श्रीमंत व्हायचंय कि असं ओआरएस पिऊ शकेन." अशी कमेंट केलीये. "त्या घटनेनंतर गौरी ओरडली असेल." अशा अनेक फनी कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.

शपथविधीला 'या' दिग्गजांनी लावली हजेरी

रजनीकांत, शाहरुख खान, अक्षय कुमार, विक्रांत मेस्सी आणि नुकतीच खासदार झालेल्या कंगना रनौतने शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. शपथविधी सोहळ्यातील या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या शिवाय बऱ्याच देशाच्या प्रमुखांनी हजेरी लावली होती आणि अनेक उद्योगपतींनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.