Subodh Bhave : मुंबईतील वाढती ट्रॅफिक समस्या ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरतेय. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा संताप व्यक्त केलाय. अभिनेता सुबोध भावेनेही सोशल मीडियावर पोस्ट करत या ट्रॅफिक जाम बाबत नाराजी मजेशीररित्या व्यक्त केली.
सुबोध भावेने सोशल मीडियावर रस्त्यात झालेल्या ट्रॅफिकचा व्हिडीओ शेअर केला आणि त्याला "ट्रॅफिकमुळे आज ९ चा एपिसोड पण १० वाजता सुरु होईल वाटतं " असं कॅप्शन दिलं आहे. सुबोधने एक प्रकारे खिल्ली उडवत ट्रॅफिकच्या समस्येवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्याही समस्या व्यक्त केल्या.
एकाने "अभिमन्यू सर लेट होत नाही कधी." असं म्हणत वेळेत जाण्याचा सल्ला दिला. तर एकाने "लवकर निघायचे ना घरातून जरा" असं म्हंटलं. तर एकाने त्याच्या तू भेटशी नव्या मालिकेचं कौतुक केलं. या मालिकेतील त्याची भूमिका आवडत असल्याचं म्हंटलं. तर अनेकांनी ही मालिका अशीच चालू राहावी अशी इच्छा व्यक्त केली.
या आधी अभिनेता शशांक केतकरनेही सोशल मीडियावर उपहासात्मक व्हिडीओ शेअर करत ट्रॅफिकच्या समस्येवर भाष्य केलं होतं. तो म्हणाला होता कि,"वाव, मीरा रोड आणि ठाण्याच्या मध्ये लोणावळ्याचा फील देण्यासाठी ही एक योजना आखली आहे. खरंतर आपल्याला कारण कळत नाही. सिग्नल चांगले लावून सिग्नलचे खर्च वाढवण्यापेक्षा रस्त्यात खड्डे, चुकीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आणि बेशिस्तपणा यामुळे सिग्नलचं एक वेगळं काम आपल्याचकडून केलं जातंय ही वेगळी दृष्टी आपल्याच देशाकडे आहे. मला फार बरं वाटतंय सिग्नलचा हा खर्च वाचतो, खड्ड्यांमुळे स्पीड ब्रेकर्सचा खर्च वाचतो. केवढी वेगळी दृष्टी लागते या सगळ्याला. लोकांचा वेळ, जीव तसही भारतात फार महत्त्वाचं नाहीये. आता लोकांनी गाड्यातून उतरून चालत जाण्याचा निर्णय घेतलाय. मी पण आता गाडी इथेच पार्क करून चालत सेटवर जाण्याचा विचार करतोय. रात्री ९-१० पर्यंत या गाड्या हलतील असं मला काही वाटत नाही. क्या बात है!"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.