Vidyut Jammwal Movie : सुप्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल सध्या त्याच्या बद्दलच्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये तो कर्जबाजारी झाल्यामुळे एका सर्कस मध्ये काम करत असल्याची चर्चा आहे. मात्र खुद्द विद्युत जामवालने या अफवेचे स्पष्टीकरण देत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.
जबरदस्त अक्शन आणि स्टंट्समुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता विद्युत जामवाल अखेरचा क्रॅक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमाची निर्मितीही त्याने केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यामुळे विद्युतचं बरंच नुकसान झालं होतं. अनेक कोटींचं नुकसान त्याला सिनेमामुळे भोगावं लागलं होतं आणि नुकसान भरून काढण्यासाठी त्याने चक्क एका फ्रेंच सर्कसमध्ये काम केलं होतं. त्याने ते कर्ज फक्त तीन महिन्यांमध्ये फेडलं.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विद्युत जामवाल हा अजूनही सर्कसमध्ये काम करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विद्युतने मात्र यावर एक टोमणा मारणारी पोस्ट टाकून मी मलाही त्या सर्कसचा पत्ता पाठवून द्या, मलाही तिथे जाऊन मजा करायला आवडेल असा प्रश्न instagram वर विचारला आहे.
विद्युतचा क्रॅक हा सिनेमा फेब्रुवारीमध्ये रिलीज झाला. या सिनेमाचं बजेट ४५ कोटी होतं आणि त्याने १७ कोटींची कमाई केली होती. आयबी १७ हा सिनेमाही त्या आधी रिलीज झाला होता आणि या सिनेमाने २९ कोटींची कमाई केली होती आणि आयबी १७ या सिनेमाचं बजेट ४० कोटी इतकं होत. दोन्ही सिनेमात नुकसान सहन करावं लागल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता.
झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा प्रसंग शेअर केला आणि त्याने हे नुकसान कसं भरून काढलं ते सांगितलं. तो म्हणाला,""मी खूप पैसे गमावले. माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती की, मी त्याचा सामना कसा करेन. पैसे गमावल्यावर तुम्हाला खूप सल्ले मिळतात. तुम्हाला तेच मदत करतात ज्यांना तुमची खरंच काळजी आहे. क्रॅकच्या रिलीजनंतर मी एका फ्रेंच सर्कसमध्ये सामील झालो आणि या चांगल्या लोकांबरोबर मी १४ दिवस घालवले. त्यानंतर मी त्या सर्कसमधील अशा व्यक्तीबरोबर वेळ घालवला जी तिचं शरीर कोणत्याही प्रकारे वळवू शकते. तिथल्या मुलांबरोबर मी वेळ घालवला. तेव्हा मला जाणीव झाली या सगळ्यांमध्ये मी फार लहान आहे. मग मी शांत झालो. जेव्हा मी परत मुंबईला आलो तेव्हा मी शांतपणे बसून हे कर्ज कसं फेडायचं यावर विचार केला आणि तीन महिन्यात मी कर्जमुक्त झालो."
विद्युतचा 'जंगली' हा सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमात त्याच्याबरोबर पूजा सावंत आणि आशा भट्ट यांच्याबरोबर काम केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.