Actor Vijay : तामिळ अभिनेता आणि राजकारणी विजय (Vijay) त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्त त्याच्याकाही फॅन्सनी एकत्र येत एक कार्यक्रम आयोजित केला होता. चेन्नईमधील नीलनकराई भागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ११ वर्षाच्या मुलगा मार्शल आर्ट्समधील स्टंट करताना हात जबर जखमी झाला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय कि. एक लहान अकरा वर्षांचा मुलगा हाताला आग लावून लादी तोडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तो हे करताना यशस्वी झाला पण हातावरची आग विझवण्यात त्याला अपयश आलं आणि त्यामुळे तो मुलगा खूप घाबरला होता. त्यामुळे तो जोरजोरात हात हलवू लागला त्यामुळे आगीच्या ज्वाला सगळीकडे उडू लागल्या आणि त्यामुळे स्टेजलाही आग लागली. तोपर्यंत इतर लोकांनी स्टेजवर येत त्याच्या हातावरची आग विझविण्याचा प्रयत्न केला.
न्यूज मिनिटने दिलेल्या बातमीनुसार, नीलकराई जे ८ पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर बाळू यांनी सांगितलेलं कि, त्या मुलाच्या हातावर ३ ते ५ टक्के भाजल्याच्या जखमा आहेत. उजव्या हातावर त्याला ही जखम झाली आहे. मुलाच्या कुटूंबानी केलेल्या विनंतीनंतर हा कार्यक्रम आयोजित केलेल्या आयोजकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हे नमूद करणं महत्त्वाचं आहे कि, विजयने त्याच्या फॅन्सना आणि तामिळ वेट्री काझमच्या कार्यकर्त्यांना त्याच्या पन्नासावा वाढदिवस साजरा करू नये अशी विनंती केलेली असूनही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकुरचीमध्ये विषारी दारूमुले पन्नास लोकांना प्राण गमवावे लागले होते त्यामुळे विजयने त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
विजयने त्याच्या राजकीय पक्षाच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत म्हंटल होतं कि,"कलाकुरची मध्ये बनावट दारू पिऊन २५ हुन अधिक लोकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुःखदायक आणि धक्कादायक बाब आहे. मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबाच्या दुःखात मी सहभागी आहे आणि जे आजारी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.