अभिनेत्री आणि खासदार असलेल्या जया बच्चन या त्यांच्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. समाजवादी पार्टीच्या सदस्य असलेल्या जया यांनी आज राज्यसभेत भाषण दिल. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पण भाषण करण्यापूर्वी स्पीकरने त्यांचं नाव जया अमिताभ बच्चन असं घेताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
सोमवारी राज्यसभेत दिल्ली कोचिंग दुर्घटनेवर चर्चा सुरू होती. यावेळी चर्चेत सहभागी होण्यासाठी उप सभापतींनी समाजवादी पार्टीच्या सदस्य जया बच्चन यांचं नाव 'जया अमिताभ बच्चन' असं पुकारलं. त्यावेळी जया बच्चन नाराज झाल्या आणि त्यांनी स्पीकर यांना "तुम्ही फक्त जया बच्चन इतकं नाव घेतलं असतं तर बरं झालं असतं" असं उत्तर दिलं. त्यावर उपसभापती असं म्हणाले की," इथे तुमचं पूर्ण नाव लिहिलेलं आहे त्यामुळे मी ते तसेच घेतलं." त्यावर जया बच्चन त्यांची नाराजी व्यक्त करत म्हणाल्या की, "आता हे जे काही नवीन पद्धत पडली आहे की बायको नवऱ्याच्या नावाने ओळखली जाईल. यामुळे त्या स्त्रीचं काही अस्तित्वच उरत नाही. हे चुकीच आहे." त्यावर स्पीकर यांनी उत्तर दिलं की, "तुमचं खूप मोठं अस्तित्व आहे." पण हा वाद वाढवण्यापूर्वीच जया शांत झाल्या आणि त्यांनी दिल्ली दुर्घटनेवर भाष्य केलं
दिल्ली कोचिंग दुर्घटनेवर भाष्य करताना जया म्हणाल्या, "बऱ्याच वर्षांनी ही अशी घटना मी पाहिली जिथे पिडितांविषयी आदराने बोलण्या ऐवजी त्याचा राजकारण केलं जातंय. निर्भया हत्याकांडावेळी असं घडलं होत. आता मी जे बोलतेय ते एक आई आणि आजी म्हणून बोलतेय. सगळ्यांनी दिल्ली कोचिंग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांना श्रद्धांजली वाहिली पण कुणीच त्यांच्या कुटुंबाविषयी बोललं नाही त्यातले कोणी शेतकरी होते तर कोणी काही होते कुणी इतर व्यवसायात होते पण त्यांच्या दुःखावर कुणीच बोललं नाही. कुणालाच याची जाणीव नाही की त्या कुटुंबावर काय वेळ आली असेल. मी एक कलाकार आहे आणि चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज खूप चांगली समजते. सगळेजण फक्त त्यांचं राजकारण पुढे नेत आहेत. हे खूप चुकीचा आहे. मी जेव्हा शपथ घेण्यासाठी दिल्लीत आले तेव्हा माझ्या घराची अवस्था खूप वाईट होती. मी जवळपास गुडघाभर पाण्यातून राज्यसभेत आले होते. घरातील सगळं सामान खराब झालं होतं. आम्हा खासदारांच्या घराची व्यवस्था जे कोणी यंत्रणा बघते ती अतिशय वाईट आहे आणि यात फक्त या सरकारची चूक नाहीये यात आपल्या सगळ्यांची चूक आहे. आपण कधीच यावर तक्रार करत नाही. त्यामुळे कधीच त्यावर कारवाई होत नाही आणि हे सगळं तसंच चालत राहतं."
जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेले हे छोटसं भाषण सध्या खूप चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या विचारांशी ते सहमत आहेत असं म्हणत त्यांना पाठिंबा दिला. जया यांचं हे भाषण आणि त्यांचे विचार अनेकांना पटल्याचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सांगितलं. तर अमिताभ यांचे नाव घेताच भडकलेल्या जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.