Kangana Ranaut : 'आठवड्याच्या सुट्टीची वाट पाहणं म्हणजे पाश्चिमात्यकरण' ; खासदार-अभिनेत्री कंगना यांच्या सुतोवाचाने वेधलं लक्ष

Kangana Ranaut reaction on weekend and monday blues : अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या देशाला प्रगती करायची असेल तर आठवड्याच्या सुट्टीची वाट पाहू नका असा सल्ला दिलाय.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Esakal
Updated on

Kangana : अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेली टीका असो किंवा भारताच्या स्वातंत्र्यवरील त्यांचं वक्तव्य. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यांची चर्चा कायमच रंगलेली पाहायला मिळते. नुकतंच त्यांनी आठवड्याच्या सुट्ट्यांबाबत केलेल्या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Kangana Ranaut
Kangana Ranaut : एका निशस्त्र महिलेला.. थप्पड प्रकरण वापरून कंगनाचे फिल्म प्रोमोशन, इंदिरा गांधींचा फोटो केला शेअर

काय म्हणाल्या कंगना ?

सोशल मीडियावर कंगनाने पंतप्रधान मोदीजी यांचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मोदीजी तरुणांना संबोधित करताना विकसित भारतावर बोलत आहेत. त्याला कॅप्शन देत कंगना यांनी म्हटलंय कि,"आपल्याकडे Obsessive work culture (अतिपरिश्रम करण्याची संस्कृती) बिंबवणं गरजेचं असून आपण आठवड्याच्या सुट्टीची वाट पाहणं आणि 'मंडे ब्लूज'चे मिम्स पाहून दुःख व्यक्त करणं थांबवलं पाहिजे. हे सगळं पाश्चिमात्य संस्कृतीचं उद्दात्तीकरण आहे आणि अजून आपण विकसित देश झालो नसल्यामुळे आपण आळस आणि कंटाळा सोडला पाहिजे. "

Kangana Ranaut Post
Kangana Ranaut PostEsakal

जनतेची प्रतिक्रिया

कंगना यांची ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवल्या. काहींनी कंगना यांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली तर एकाने अशी प्रतिक्रिया दिली कि,"तुम्ही रोज सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा, तुमचं काम करा. लांब रांगांमध्ये उभं राहून तुम्हाला लागणाऱ्या वस्तू आणा आणि मग या सगळ्यावर भाष्य करा. " तर एकाने म्हंटलं कि,"कंपनीला सगळ्या नोकरदारांना उत्तम पगार द्यायला सांग आणि मोदींना टॅक्सेस बदलायला सांग मग आम्ही बघू."

या आधी असच विधान उद्योगपती नारायण मूर्ती यांनी केलं होतं त्यावर लोकांनी टीका केली होती.

मंडीमधून निवडणुकीत विजय

भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच कंगना २०२४ लोकसभा निवडणुकीत मंडी विधानसभेतून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंग यांचं आव्हान होतं. कंगनाला या निवडणुकीत ५,३७,०२२ मते मिळाली तर विक्रमादित्य यांना ४,६२,२६७ मते मिळाली. ७४,७५५ मतांच्या फरकामुळे कंगना यांचा विजय झाला आणि त्या मंडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार बनल्या.

Kangana Ranaut
Kangana Ranaut: कंगनाला कानशि‍लात लगावणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांना नोकरी देणार 'हा' स्टार; पोस्टनं वेधलं लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.