Marathi Entertainment News : अभिनेता भूषण प्रधान सध्या त्याच्या प्रोजेक्टमुळे आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. यावर्षी त्याचे घरत गणपती आणि जुनं फर्निचर हे सिनेमे गाजले. पण त्याबरोबरच तो चर्चेत आला आहे आहे अनुषा दांडेकरशी असलेल्या नाट्यविषयीच्या चर्चांमुळे. अनुषा आणि भूषण एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या आहेत. नुकताच भूषणने त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनुषाने त्याच्यासाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.