अभिनेत्री दलजित कौर सध्या तिचा दुसरा नवरा निखिल पटेलबरोबर सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. तिच्या नवऱ्याने तिला लवकरात लवकर केनियामध्ये येऊन तिचं सामान परत घेऊन जाण्याची कायदेशीर नोटीस पाठवली होती. दलजितने आता या नोटिसीला उत्तर दिलं असून तिने केनियात जाऊन तिच्या पतीविरोधात कोर्टाकडून स्थगितीचा आदेश मिळवला आहे. या आदेशानुसार, निखिलने दलजित आणि तिचा मुलगा जेडनला त्यांच्या केनियातील घरातून बाहेर काढून नये म्हणून हा आदेश देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच दलजितने तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते. यानंतर निखिलने तिला कायदेशीर नोटीस पाठवत दलजितने तिचं केनियामध्ये असलेलं सामान घेऊन जावं आणि त्याच्याविरोधात कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करू नये असं म्हंटलं होतं. यावर दलजितच्या वकिलांनी खटला दाखल करत स्थगितीचे आदेश मिळवले आहेत.
केनियातील कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार,दलजितला किंवा तिच्या मुलाला अर्जाची सुनावणी आणि अंतिम निर्णय होईपर्यंत, पटेल रोखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. त्याचे एजंट, कर्मचारी आणि/किंवा नोकरांनी याचिकाकर्ता/अर्जदार (कौर) आणि तिच्या मुलाला (जेडॉन) बाहेर काढण्यापासून आणि/किंवा बाहेर फेकून देण्यापासून आणि/किंवा याचिकाकर्त्या/अर्जदाराच्या वैवाहिक घरातील वैयक्तिक प्रभाव आणि वस्तूंशी संबंधित काहीही वस्तू बाहेर फेकण्यापासून मनाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच दलजित केनियाला गेली होती. यावेळी तिने कोर्टात धाव घेत निखिलने पाठवलेल्या नोटिसीवर स्थगिती आणली आता दलजित निखिलवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दलजितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. , "तू आता निर्लज्जपणे तिच्यासोबत सोशल मीडियावर दिसत आहेस. तुझी पत्नी आणि मुलगा लग्नाच्या 10 महिन्यांनंतर भारतात परतले, संपूर्ण कुटुंबाचा अपमान झाला. तू मुलांसाठी थोडी प्रतिष्ठा ठेवायला हवी होती.” दलजीतने पुढे कॅप्शनमध्ये लिहिलं, “किमान तू सार्वजनिक ठिकाणी तुझ्या पत्नीला थोडा सन्मान द्यायला हवा होतास कारण मी इतर अनेक गोष्टींबद्दलही गप्प राहिले होते." अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.
हे सगळे आरोप निखिलने नाकारत ती स्वतःहुन सोडून गेल्याचा दावा तिने केला होता आणि तिने पुन्हा त्यांची मानहानी केली तर कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.