Dalljeit Kaur FIR : अभिनेत्री दलजित कौरने तिचा पती निखिल पटेल विरोधात हिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याबद्दल माहिती दिली. दलजितने मुंबईतील आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये निखिल विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दलजितने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. ती म्हणाली,"एफआयआर दाखल करण्याचा माझा अनुभव लिहिण्याशिवाय मी स्वतःला रोखू शकले नाही. पोलीस सहआयुक्त अनिल पारसका यांनी खूप मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार. आग्रीपाडा पोलिस स्टेशन इतके कार्यक्षम असल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तुमच्या तत्पर प्रतिसादामुळे मी एकटी नाहीये आणि सुरक्षित आहे हा आत्मविश्वास वाढवण्यास मला मदत झाली. पोलिस उपायुक्त कृष्णकांत सरांनी धीराने माझे म्हणणे ऐकले. आणि काही वेळातच आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे सर यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. मला शांत करण्यासाठी आम्हाला पाणी दिले जात आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता आणि आम्ही सगळं सत्य पोलिसांना सांगितलं. सरांनी मला आणि माझ्या वडिलांना खूप धीर दिला कारण जे काही घडत आहे त्यामुळे आम्ही खूप हादरलो होतो. तेव्हा तपास अधिकारी सचिन शेळके सरांनी संपूर्ण एफआयआर इतक्या संयमाने आणि सहानुभूतीने पार पाडला. एक लेडी कॉन्स्टेबल होती जी माझ्या फायलींगच्या वेळी बसली होती आणि ती संपूर्ण फाइलिंग दरम्यान खोलीत होती. मला आता खात्री पटली आहे की जेव्हा तुम्ही कायद्याच्या योग्य बाजूने असाल आणि सत्याच्या बाजूने असाल तेव्हा भारतीय पोलिस तुम्हाला मदत करतील. मला आता माहित आहे की, आपल्या देशात महिला सुरक्षित आहेत."
दलजित कौरचा दुसरा पती निखिल पटेल आणि तिच्यामध्ये सध्या लग्नावरून गेला बराच काळ वाद सुरु आहेत. दलजितने निखिलने तिची फसवणूक केल्याचं म्हंटलं आहे. तर निखिलने दलजित स्वतःहूनच घर सोडून गेल्याचा आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वीच निखिल मुंबईत त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर परत आल्याचं समजतंय. सोशल मीडियावर हॉटेलमध्ये चेक इन करतानाचे त्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून दलजितने एक संतप्त पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.