Dimple Kapadia : डिंपलने ‘बॉबी’साठी दिली होती दोनदा स्क्रीन टेस्ट, तिच्या बॉलिवूड डेब्यूची कहाणी आहे खूपच रंजक..

अभिनेत्री डिंपल कपाडिया आजही चित्रपटसृष्टीत तितक्याच उत्साहाने काम करीत आहे. आजही ती आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवीत आहे.
Dimple Kapadia
Dimple KapadiaSakal
Updated on

Dimple Kapadia : अभिनेत्री डिंपल कपाडिया आजही चित्रपटसृष्टीत तितक्याच उत्साहाने काम करीत आहे. आजही ती आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवीत आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर डोळे आणि कणखर आवाज लाभलेली ही अभिनेत्री तिच्या काळातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या बॉलिवूड डेब्यूची कहाणी खूपच रंजक आहे.

पहिल्या चित्रपटासाठी तिला एकदा नव्हे तर दोनदा स्क्रीन टेस्टच्या प्रक्रियेतून जावे लागले. डिंपल कपाडियाने १९७३ मध्ये ‘बॉबी’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात तिचे सहकलाकार दिवंगत अभिनेते ऋषी कपूर होते, तर चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषी कपूर यांचे वडील आणि बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांनी केले होते;

पण ‘मेरा नाम जोकर’च्या दयनीय अपयशाने राज कपूर यांची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आली. मुलगा ऋषी कपूरला लॉन्च करण्यासाठी त्यांनी बॉबी हा चित्रपट बनवण्याचा विचार केला आणि त्यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू केला. असे म्हटले जाते की, राज कपूर यांनी अभिनेत्रीसाठी वर्तमानपत्रात जाहिरातही प्रसिद्ध केली होती, ती वाचून डिंपल कपाडिया ‘बॉबी’साठी स्क्रीन टेस्ट देण्यासाठी गेली होती;

पण सुरुवातीला राज कपूरना तिची ऑडिशन आवडली नाही आणि डिंपलला नाकारण्यात आले. त्याला वाटले की, पात्रानुसार डिंपल ऋषीपेक्षा वयाने मोठी दिसते. ‘बॉबी’ या चित्रपटाच्या स्क्रीन टेस्टमध्ये प्रथमच अपयशी ठरल्यानंतर डिंपल कपाडियाला तिच्या वडिलांमुळे दुसरी संधी मिळाली. वास्तविक तिच्या वडिलांचा एक मित्र राज कपूर साहेबांचा मित्रही होता. डिंपलने ‘बॉबी’साठी दुसऱ्यांदा स्क्रीन टेस्ट दिली असता दिग्दर्शकाला ती आवडली.

त्‍यानंतर तिची बॉबीसाठी निवड झाली. ‘बॉबी’ या चित्रपटाने यशाचे सर्व रेकॉर्ड तोडले. काही शहरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सहा महिने हाऊसफुल्ल राहिला. इतकेच नाही तर १९७३च्या टॉप चित्रपटांमध्ये बॉबीचा समावेश होता. या चित्रपटात डिंपल कपाडियाने आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली. ‘बॉबी’च्या यशाने राज कपूर यांची बुडती कारकीर्द पुन्हा बहरात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.