एकदम झकास! 'चंदू चॅम्पियन'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; कार्तिक आर्यनबद्दल बोलताना म्हणाली-

Chandu Champion: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चंदू चॅम्पियन'मध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत एक मराठमोळी अभिनेत्री देखील झळकते आहे.
chandu champion
chandu champion sakal
Updated on

Chandu Champion: गेले कित्येक दिवस कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आज १४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात कार्तिक हा सैन्य अधिकारी मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेत दिसत आहे. पॅरालिम्पिक विजेते असलेल्या मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या बॉलिवूड चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्रीदेखील झळकत आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

या चित्रपटाचं प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. कार्तिकने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच चाहते कार्तिकचं तोंडभरून कौतुक करत आहेत. अशातच एक मराठी अभिनेत्रीदेखील कार्तिकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतेय. ही अभिनेत्री आहे हेमांगी कवी. हेमांगीने आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने कायम वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांना चकीत केलं. आता ती थेट कार्तिकसोबत मोठ्या पडद्यावर झळकली आहे. आज चित्रपट प्रदर्शित होताच तिने एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिने चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकासोबत फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

तिने ही पोस्ट शेअर करत कार्तिकचं कौतुक केलं आहे. मी आजवर पाहिलेला प्रचंड मेहनती, गुणी आणि ध्येयाप्रती एकाग्र असलेला कलाकार कार्तिक आर्यन ज्याने या चित्रपटात मुरलीकांत यांना जिवंत केलं आहे. त्याच्यासोबत काम करणं ही अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत तिने कार्तिकचं कौतुक केलं आहे. तर तिच्या पोस्टनंतर चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

chandu champion
Drashti Dhami: लग्नाच्या ९ वर्षानंतर आई बनणार टीव्हीची मधुबाला; नवऱ्यासोबत खास व्हिडिओ शेअर करत दिली गुड न्यूज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.