Loksabha Elections 2024 : 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे वडीलही होते निवडणुकीच्या शर्यतीत ! "हा खूप कठीण दिवस..." सोशल मीडियावर शेअर केल्या भावना

Actress wrote heartfelt note on social media after loksabha election: बॉलिवूड अभिनेत्रीने तिचे वडील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांचं समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Actress Heartfelt Note
Actress Heartfelt NoteEsakal
Updated on

Loksabha Elections 2024 : बॉलिवूडमध्ये विविध प्रोजेक्ट्समध्ये काम करणारी अभिनेत्री नेहा शर्मा ही राजकारणी अजित शर्मा यांची मुलगी आहे. काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर अजित शर्मा यांचा भागलपूर मतदारसंघातून पराभव झाल्याचं जाहीर झालं.

यानंतर नेहाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांना मत देणाऱ्या सगळ्या नागरिकांचे आभार मानले.

नेहाची पोस्ट

"हा दिवस आमच्यासाठी कठीण होता. आपण सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि मी त्या सगळ्या जनतेची आभारी आहे ज्यांनी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना मत दिलं.आता आपण आपलं पुढील आयुष्य जगायला सुरुवात करणार असलो तरीही लक्षात ठेवा कधीही न हरणं यात नाही तर हरल्यानंतर पुन्हा त्याच ताकदीने उठून उभं राहण्यात आपलं यश आहे

सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो

तुम निडर डरो नहीं, तुम निडर डटो नहीं

वीर तुम बढे चलो ! धीर तुम बढे चलो! " अशी पोस्ट नेहाने शेअर केली आहे.

Neha Sharma Post
Neha Sharma Post

कोण आहे नेहा शर्मा ?

नेहा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून आजवर तिने अनेक सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. 'चिरुथा' या तेलुगू सिनेमातून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं. तर बॉलिवूडमधील 'क्रूक' हा तिचा पहिला सिनेमा होता.

तिचे 'क्या सुपर कूल है हम',' यमला पगला दिवाना २','सोलो' आणि 'तान्हाजी' हे सिनेमे गाजले. याबरोबरच तिने 'इलिगल' या वेब सीरिजमधून वेब विश्वात पदार्पण केलं. लवकरच ती आणखी काही बॉलिवूड प्रोजेक्टसमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Actress Heartfelt Note
Mandi Constituency Lok Sabha Election Result: राजकुमारावर क्विननं मारली बाजी; मंडीमधून कंगना रनौत विजयी, चित्रपटातून घेणार संन्यास ?

भागलपूर मतदारसंघात अजित शर्मा यांची हार

नेहाचे वडील अजित शर्मा यांनी बिहारमधील भागलपूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फ़े लोकसभा निवडणूक लढवली. जेडीयूचे उमेदवार अजय मंडल या निवडणुकीमध्ये ५,३६,०३१ मतांनी विजयी झाले तर अजित यांना ४,३१,१६३ मते पडली. जवळपास १,०४,८६८ मतांनी अजित यांचा पराभव झाला.

Actress Heartfelt Note
Amethi Constituency Election Result: अमेठीत स्मृती इराणी पराभूत; काँग्रेसने घेतला राहुल गांधींचा पराभवाचा बदला..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.