Nirmitee Sawant : जेव्हा राणीने मराठी शिकण्यासाठी घेतली निर्मिती सावंत यांची मदत ; किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली...

Nirmitee Sawant and Rani Mukherjee Bond : अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी 'अय्या' सिनेमा दरम्यान राणी मुखर्जीबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.
Rani Mukherjee & Nirmitee Sawant
Rani Mukherjee & Nirmitee SawantEsakal
Updated on

Nirmitee Sawant Interview : कमाल कॉमेडी सेन्स आणि उत्तम अभिनय यामुळे निर्मिती सावंत मराठी इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहेत. निर्मिती यांनी काही बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'अय्या' आणि 'सत्यप्रेम कि कथा' या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. या सिनेमाच्या अनुभवाविषयी त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

राणीने घेतली मदत

निर्मिती यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी राणी मुखर्जीचा 'अय्या' सिनेमात काम करतानाच किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या,"मी अय्या आणि सत्यप्रेम कि कथा या दोन बॉलिवूड सिनेमात काम केलं. या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक मराठी होते. सचिन कुंडलकर यांनी अय्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्यात मी राणीच्या आईची भूमिका साकारली होती. मी मनापासून सांगते राणी खूप ग्रेट अभिनेत्री आहे. झिम्मा सिनेमातील परफॉर्मन्समुळे सत्यप्रेम कि कथा सिनेमाच्या टीमला मी त्या सिनेमात हवे होते आणि समीरमुळे या सिनेमाला होकार दिला.

पण राणीविषयी मी सांगेन कि 'अय्या' सिनेमात राणीचा एक मोनोलॉग होता. ज्यात ती मराठी, तामिळ आणि हिंदीतही बोलते. म्हणजे ती आमच्याशी मराठीत बोलते आणि हिंदीतही बोलते, तामिळही बोलते. हे सगळं तिने भन्नाट परफॉर्म केलं. ती ते सगळं बसून पाठ करत होती आणि मला ती विचारायची आई मी हे बोलतेय ते बरोबर आहे ना! तिने ठरवलं असतं तर ती ते डबिंगमध्ये करू शकली असती पण तिने ते सगळं मेहनतीने परफॉर्म केलं. "

Rani Mukherjee & Nirmitee Sawant
Rani Mukerji : 'माझ्या आजवरच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक...',19 वर्षांनी 'ब्लॅक' OTT वर आला, राणीची भावूक करणारी प्रतिक्रिया!

सोशल मीडियावर निर्मिती यांची ही मुलाखत चर्चेत आहे. निर्मिती यांचा झिम्मा , झिम्मा २ हा सिनेमाही गाजला. रंगभूमीवर सुरु असलेल्या व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचंही खूप कौतुक झालं.

Rani Mukherjee & Nirmitee Sawant
Rani Mukerji : राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com