Rupali Ganguly : भाजपात प्रवेश करणाऱ्या रुपाली यांचं बॉलिवूड कनेक्शन

Rupali Ganguly Bollywood Connection : भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुली यांचं बॉलिवूडशीही खास नातं आहे. जाणून घेऊया त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनविषयी.
Rupali Ganguly Bollywood Connection
Rupali Ganguly Bollywood Connection
Updated on

'अनुपमा', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी (Rupali Ganguly ) भाजपा पक्षात प्रवेश केल्यामुळे चर्चेत आहे. उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या रुपाली यांचा इंडस्ट्रीतील प्रवासही इंटरेस्टिंग आहे. जाणून घेऊया रुपाली यांच्या बॉलिवूड कनेक्शनविषयी.

रुपाली यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण तुम्हाला माहित आहे का? रुपाली यांचे वडील हे बॉलिवूडमधील नावाजलेले दिग्दर्शक होते. रुपाली यांच्या वडिलांचं नाव अनिल गांगुली (Anil Ganguly) असं आहे.

त्यांचे 'कोरा कागज', 'तपस्या' हे सिनेमे खूप गाजले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 'कोरा कागज' या सिनेमात अभिनेत्री जया भादुरी यांची मुख्य भूमिका होती तर 'तपस्या' या सिनेमात राखी यांनी लीड रोल केला होता.

Rupali Ganguly Bollywood Connection
Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतलं कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'साहेब' या सिनेमातून रुपाली यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. या सिनेमात अनिल कपूर, अमृता सिंह, राखी यांची मुख्य भूमिका होती.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असूनही रुपाली यांच्या वडिलांचे १९८६ नंतर प्रदर्शित झालेले सात सिनेमे फ्लॉप झाले. यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. अनिल यांचं १५ जानेवारी २०१६ ला वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं.

आर्थिक संकटावर मात करत घडवली अभिनेत्री म्हणून कारकीर्द

वडिलांवर आलेल्या आर्थिक संकटामुळे रुपाली आणि त्यांच्या भावाने खूप कष्ट करत इंडस्ट्रीत स्वतःची ओळख तयार केली. रुपाली यांनी 'दो आंखें बारह हाथ', 'अंगारा' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. नंतर त्यांनी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

संजीवनी या स्टार प्लसवरील मालिकेत त्यांनी साकारलेलं 'सिमरन' हे खलनायकी पात्र खूप गाजलं. तर 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या स्टार वनवरील मालिकेत त्यांनी साकारलेली मोनिशा सगळ्यांना आवडली. त्यानंतर काही काळ रुपाली यांनी मालिकांमधून ब्रेक घेतला होता. पण काही वर्षांपूर्वी स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेतून त्यांनी कमबॅक केलं. अजूनही ही मालिका स्टार प्लसवरील आघाडीच्या मालिकांपैकी एक आहे.

Rupali Ganguly Bollywood Connection
Rupali Bhosle: "गेली ४ वर्ष आमच्या सेटवर...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचा मोठा खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.