Viral Video : 'अंगारो' गाण्यावर साईशाचा बहिणीबरोबर धमाल डान्स ; नेटकरी म्हणाले...

Saisha dances on Angaro song : बालकलाकार साईशा साळवीने अंगारो गाण्यावर भन्नाट डान्स केला.
Saisha Salvi
Saisha SalviEsakal
Updated on

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या चिमुकल्या साईशा साळवीने अल्पावधीतच सगळ्यांची मनं जिंकली. सध्या ती कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत नसली तरी तिच्या सोशल मीडियावर पोस्ट कायमच चर्चेत असतात.

सध्या पुष्पा २ सिनेमातील अंगारो हे गाणं गाजतंय. या गाण्याच्या तेलुगू व्हर्जनवर साईशा आणि तिची बहीण सिरतने भन्नाट डान्स केला.

साईशाचा कमाल डान्स

साईशाने तिच्या बहिणीबरोबर पुष्पा २ सिनेमातील अंगारो या गाण्यावर धमाल डान्स केला. यावेळी तिची धाकटी बहीण सिरतसुद्धा होती. साईशाने केलेल्या हुबेहूब स्टेप्स आणि ताईला फॉलो करण्याचा सिरतचा आटोकाट प्रयत्न या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. साईशाने श्रीवल्लीसारखा केलेला लूकही अनेकांना आवडला.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

साईशा आणि तिच्या बहिणीच्या डान्सवर अनेकांनी कमेंट्स करत त्या दोघींचं कौतुक केलं. सगळ्यांनी हार्ट इमोजीस शेअर करत त्यांना डान्स आवडल्याचं म्हंटलं तर अनेकांनी सिरत खूप छान नाचतेय असं म्हणत तिचं कौतुक केलं. मोठ्या बहिणीला दिलेली तिने साथ सगळ्यांना आवडली.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मिळाली ओळख

साईशाला ओळख मिळाली ती स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे. या मालिकेत तिने जयदीप आणि गौरीची मुलगी लक्ष्मीची भूमिका साकारली होती. शिर्के पाटलांच्या घरी असणारी ही लहानगी लक्ष्मी सगळ्यांना आवडली होती. तिची भूमिका खूप चर्चेत होती. पण मालिकेत लीप आल्यानंतर तिला ही मालिका सोडावी लागली. त्यानंतर तिने अजूनपर्यंत कोणत्याही नवीन मालिकेत काम केलं नाहीये पण काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

मराठी सेलिब्रिटीजमध्ये अंगारोची क्रेझ

या आधीही मराठी इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटीजनी या गाण्यावर परफॉर्मन्स केला आहे. पारू मालिकेच्या टीमचा डान्स व्हायरल झाला होता तर अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील सिंबा आणि अप्पीनेही या गाण्यावर डान्स केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.