Sanskruti : अभिनेत्री संस्कृती बालगुडेने अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी सिनेविश्वात पदार्पण करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच मित्र म्हणे या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संस्कृतीने इंडस्ट्रीमधील गटबाजी आणि ऑडिशनमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपावर भाष्य केलं.
सिनेइंडस्ट्रीतील विविध अनुभवांबाबत सांगताना संस्कृतीने तिच्या बाबत घडलेला किस्सा शेअर केला. ती म्हणाली,"मला एका दिग्दर्शकाचा फोन आला. ऑडिशन किंवा लूक टेस्ट असं काहीही न घेता त्याने मला सांगितलं कि मला तुझ्याबरोबर फिल्म करायची आहे. सगळं काही फायनल झालं होतं आणि नंतर अचानक मला सांगण्यात आलं कि मला त्या प्रोजेक्टमधून काढून टाकलं. नंतर मला कळलं कि, त्यातील अभिनेत्याने कास्टिंग टीमला सांगितलं कि इतर कास्टिंग तो करेल त्यामुळे मला काढून टाकण्यात आलं. त्यामुळे दिग्दर्शक तितका जबाबदार नसतो. तर प्रॉडक्शन आणि अभिनेते यांच्यावर सगळं अवलंबून असतं. आपल्याकडचं कास्टिंग कित्येकदा अभिनेते ठरवतात. "
पुढे सांगताना ती म्हणाली,"कदाचित ही माझी मैत्रीण आहे किंवा मी हिच्याबरोबर कम्फर्टेबल आहे म्हणून कदाचित ते असं करत असतील पण मराठी इंडस्ट्रीत पुरुषसत्ताक वृत्ती जास्त आहे. "
या आधीही संस्कृतीने तिला एका सिनेमाच्या सेटवर वाईट वागणूक मिळाल्याचं शेअर केलं. ती म्हणाली,"२०१७ साली मी एक मल्टीस्टारर सिनेमा केला होता. मी त्यात सेकंड लीड आहे असं मला सांगण्यात आलं होतं पण मी अक्षरशः तो सिनेमा करताना वैतागले होते. त्यात खूप जण होते आणि मला ते हॅन्डल करता येत नव्हतं. तो सिनेमा खूप लांबत होता. त्याचं शूटिंग संपत नव्हतं. मला त्या फिल्मच्या सेटवर मान मिळत नव्हता. सगळे आम्हाला गृहीत धरत होते. तिथे साधा आम्हाला स्पॉटबॉयही नव्हता. जेव्हा मी सिनेमा पूर्ण झाला आणि मी डबिंगला गेले तेव्हा माझे सीन्स कापले गेले होते. त्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता पण सीन्स कापले गेल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.