Sanskruti Balgude : "मराठी इंडस्ट्रीत माझी दखल" इंडस्ट्रीतील गटबाजीवर व्यक्त झाली संस्कृती ; "त्या सिनेमातून सीन कापले..."

Sanskruti Balgude Shared Her Experience In Industry : अभिनेत्री संस्कृती बालगुडेने मराठी इंडस्ट्रीमधील गटबाजीवर भाष्य केलं.
Sanskruti Balgude
Sanskruti BalgudeEsakal

Sanskruti Balgude : मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री आणि नृत्यांगणा संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर जरी चर्चेत असली तरीही तिचे फार प्रोजेक्ट्स रिलीज होताना दिसत नाहीयेत. गेल्या काही काळापासून संस्कृती फार कमी कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संस्कृतीने इंडस्ट्रीमधील गटबाजी आणि तिला आलेला एक वाईट अनुभव शेअर केला.

इंडस्ट्रीतील गटबाजीवर बोलली संस्कृती

संस्कृतीने नुकतीच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सौमित्र यांनी तिला तुझी अभिनेत्री म्हणून कधी दखल घेतली नाही का ? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली,"हो, मला असं खूप वाटतं कि, माझी दखल घेतली गेली नाही. मलाही असं खूप वाटतं कि, इंडस्ट्री म्हणून आपण काही लोकांचंच काम गृहीत धरतो का ? उदाहरणार्थ माझी एक सिरीज आली होती. काळे धंदे नावाची जी खूप गाजली. त्या सिरीजमध्ये माझं खूप जणांनी कौतुक केलं, इंडस्ट्रीतील मोठ्या लोकांचे मला फोन आले, त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यावेळी मी वयाने थोडी लहान होते, मला इतका अनुभव नव्हता त्यामुळे मला असं वाटलं कि, आता मला वेगवेगळ्या पुरस्कारांचे नॉमिनेशन्स मिळतील किंवा पुरस्कार मिळेल पण तसं काहीच झालं नाही. ज्या पुरस्कार सोहळ्याला ती कॅटेगरी होती तिथे मला नॉमिनेशनही मिळालं नव्हतं. माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं त्याचं मला खूप वाईट वाटलं. चौक सिनेमाच्या कामासाठीही अभिनेत्री म्हणून माझी दखल घेतली नाही. मला वाटतं कि, मी कितीही काम केलं तरीही काही लोकांसाठी ते पुरेसं नाहीये आणि माझी दखल घेतली जाणारच नाहीये. कारण, कदाचित आपण ठरवलंय काही लोकांना काम मिळतील आणि काही लोकांना मिळणार नाही. "

पुढे ती म्हणाली,"या आधीही अनेक अभिनेत्री काही वर्षांपूर्वी बोलल्या आहेत कि इंडस्ट्रीत गटबाजी आहे आणि मी कोणत्याही गटाचा भाग नाहीये. मी मुळातच खूप अंतर्मुख स्वभावाची व्यक्ती आहे. सुरुवातीच्या काळात मी माझ्या आईबरोबर इंडस्ट्रीत होणाऱ्या पार्टीजना हजेरी लावली आहे पण तेथील वातावरण मला नाही पटलं. मुळात तो प्रत्येक पार्टीत जाऊन स्वतःची ओळख सांगून काम मागणं हा माझा स्वभाव नाहीये. हा कोणताही माज नाहीये तर मी खूप अंतर्मुख असल्यामुळे मला अवघडल्यासारखं होतं. माझे असे कुणीही मित्र नाहीयेत जे मला सिनेमात घेतील. त्यामुळे आतापर्यंत मला जे काम मिळालंय ते माझ्या मेरिटवर मिळालं आहे."

Sanskruti Balgude
Mahesh Manjrekar: 'वास्तव’च्या रिमेकमध्ये दिसणार सिद्धार्थ जाधव? वाचा काय म्हणाले महेश मांजरेकर

संस्कृतीने शेअर केला वाईट अनुभव

या मुलाखतीमध्ये संस्कृतीने तिला आलेला वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. ती म्हणाली,"मी आता मान्य करते कि हा सिनेमा करायला नको होता. २०१७ मध्ये माझा जरा वाईट काळ सुरु होता आणि मी त्यावेळी एक सिनेमा केला होता जो मल्टीस्टारर होता. मी त्यात सेकंड लीड आहे असं मला सांगण्यात आलं होतं पण मी अक्षरशः तो सिनेमा करताना वैतागले होते. त्यात खूप जण होते आणि मला ते हॅन्डल करता येत नव्हतं. तेव्हा मी लहान होते त्यामुळे मला कळत नव्हतं कि, कसं वागायचं ? कशी परिस्थिती हाताळायची ? तो सिनेमा खूप लांबत होता. त्याचं शूटिंग संपत नव्हतं. मी तिथे मुख्य भूमिकेत होते आणि मला तो मान त्या फिल्मच्या सेटवर मिळत नव्हता. नंतर मला हा प्रश्न पडला होता कि मी हा सिनेमा का केला ? अनुभव चांगला होता, एका उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं हे खूप चांगलं होतं पण सेटवरचं वातावरण ठीक नव्हतं. तिथे खूप आम्हाला गृहीत धरलं जायचं, आम्हाला कुणीच गंभीरपणे घ्यायचं नाही. तिथे साधा आम्हाला स्पॉटबॉयही नव्हता. जेव्हा मी सिनेमा पूर्ण झाला आणि मी डबिंगला गेले तेव्हा माझे सीन्स कापले गेले होते. त्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता पण सीन्स कापले गेल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं."

Sanskruti Balgude
Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

संस्कृतीचा हा अनुभव चांगलाच चर्चेत होता. एका युजरने या मुलाखतीवर कमेंट करत हा सिनेमा २०१७ साली रिलीज झालेला एफयु हा महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता असं म्हटलंय. पण संस्कृतीने स्पष्ट उल्लेख केला नसल्यामुळे हा सिनेमा तोच असावा का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

User Comment
User CommentEsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com