Shraddha Kapoor Break up : श्रद्धाने केले राहुल मोदीला अनफॉलो अन् सुरू झाली ब्रेकअपची चर्चा ? काय घडलं नेमकं

Shraddha Kapoor broke up relationship with Rahul Mody : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. त्यातच एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Shraddha
Shraddha
Updated on

Shraddha Kapoor Latest Bollywood Actress Update: अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाइमलाईटमध्ये आलीये. श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध लेखक राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या. त्यातच आता त्या दोघांच ब्रेकअप झाल्याची बातमी सध्या सगळीकडे फिरतेय. सोशल मीडियावर यावर याबाबत एक स्क्रिनशॉटही व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर एका न्यूज पोर्टलने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये श्रद्धाने राहुल मोदी आणि त्यांच्या कुटूंबाला अनफॉलो केल्याचं दिसत आहे. राहुलकडे एक पाळीव कुत्रा आहे ज्याचे Instagram वर खाते देखील आहे – ज्याला श्रद्धा आत्तापर्यंत फॉलो करत होती त्या अकाऊंटलाही श्रद्धाने अनफॉलो केलं आहे.

श्रद्धाने राहुल आणि त्याच्या कुटुंबाला फॉलो करणे थांबवल्यानंतर, इंटरनेट युझर्सनी एक Redditवरील एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे जो श्रद्धाच्या “फॉलोइंग” लिस्टचा आहे. यामध्ये श्रद्धाने राहुलला अनफॉलो केल्याचं म्हंटलं जातंय . एका यूजरने लिहिले की, "अफवा आहे की तिने काही दिवसांपूर्वी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला होता पण त्याने तिला 'ओ स्त्री कल आना' (स्त्री, उद्या या) असा मजकूर पाठवला." दुसऱ्या युजरने लिहिले, “कुत्र्याला अनफॉलो करणे जरा जास्तच आहे.” 

Posts from the bollyblindsngossip
community on Reddit

श्रद्धा आणि राहुलचा खरंच ब्रेकअप झालाय कि यामागे काहीतरी वेगळं कारण आहे हे अजून समोर आलं नाहीये. दरम्यान अभिनेत्रीने तिच्या रिलेशनशिपबाबत कोणतीही गोष्ट अजून शेअर केली नव्हती त्यामुळे नक्की काय घडलंय हे समजण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

Shraddha
Shraddha Kapoor: आयपीएलची मॅच बघायला आलेल्या तरुणीनं वेधलं साऱ्यांचे लक्ष; श्रद्धा कपूर फोटो शेअर करत म्हणाली,"अरे ही तर..."

सध्या श्रद्धा स्त्री २ च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. १५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार असून राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराणा , पंकज त्रिपाठी यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचा ट्रेलर सध्या खूप चर्चेत आहे.

Shraddha
Shraddha Kapoor : अखेर लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं उत्तर, म्हणते "जेव्हा नवरी बनायचंय..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.