Vinesh Phogat Olympics 2024 : कुस्तीपटू विनेश फोगट कुस्तीच्या अंतिम फेरीतून अपात्र झाल्यावर संपूर्ण देश निराश झाला आहे. स्पर्धेत पात्र असलेल्या वजनापेक्षा फक्त १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेशला अंतिम स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामुळे विनेशसहित सगळेचजण दुःखी झाले असून संपूर्ण देश विनेशला धीर देण्यासाठी एकवटला आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर ट्विट करत विनेशचं समर्थन केलं. "१०० ग्रॅमच्या स्टोरीवर कोण विश्वास ठेवेल ?" असं ट्विट करत तिने विनेशला सपोर्ट केला सोबतच तिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर सुद्धा शंका उपस्थित केली.
स्वरा बरोबरच इतर बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशला धीर दिला. अभिनेता अर्जुन रामपालने ट्विट केलं कि, " हे असूच शकत नाही. फक्त १ ५ ० ग्रॅम जास्त वजन असल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आलं ? हे खरं असूच शकत नाही कृपया मला सांगा हे खरं असूच शकत नाही. हे सगळं बदलू शकतं. अजूनही आशा आहे." तर हुमा कुरेशीने पोस्ट केली कि, "कृपया मला सांगा की, काहीतरी मार्ग आहे.त्यांना तिला लढू द्यावं लागेल." तर सोनाक्षी सिन्हाने म्हंटलं कि,"अविश्वसनीय ! मला माहित नाही आता तुला कसं वाटतंय पण तू आमच्यासाठी कायमच चॅम्पियन आहेस." तर भूमी पेडणेकरनेही विनेशच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.
विनेशने जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून थेट अंतिम फेरीत मजल मारली होती. विनेश ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण स्पर्धेच्या सकाळी तिचं वजन जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश सध्या डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचं म्हंटलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.