Marathi Entertainment News : महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल काल लागला. महायुतीने बहुमत मिळवत सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. तब्बल 230 जागा महायुतीने जिंकल्या तर महाविकास आघाडीला केवळ 47 जागांवर समाधान मानावे लागले आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा हा पक्षफुटीच्या आरोपानंतर खूप मोठा विजय आहे. ठाकरे गटाला थोडंसं यश मिळालं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमधून राज ठाकरेंना पाठींबा देणाऱ्या अनेक कलाकरांना धक्का बसला.