Adah Sharma: “आऊटसाइडर असताना तुम्हाला सगळं शिकावं लागतं...”; नेपो किड्सना अदा शर्माचा टोमणा?

the kerala story fame Actress: नुकतच अदा शर्माने सकाळ प्रीमियर पुरस्कार २०२४ सोहळ्यात हजेरी लावली होती.
 “आऊटसाइडर असताना तुम्हाला सगळं शिकावं लागतं...”; नेपो किड्सना अदा शर्माचा टोमणा?
Adah SharmaSAKAL
Updated on

Adah Sharma: बॉलिवूड कलाकार जेव्हा मराठी भाषेत बोलतात तेव्हा कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) देखील त्यातीलच एक उदाहरण. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अदा सध्याच्या काळात विविध मराठी गाणी, कविता म्हणताना दिसते. त्यामुळे मराठी प्रेक्षकांची पसंतीची पावती तिला मिळते. याशिवाय तिचा फिटनेस, स्टाईल, डान्स यासाठी ती ओळखली जाते. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर अदा मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आली.

नुकतच अदा शर्माने सकाळ प्रीमियर पुरस्कार २०२४ सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तिने आउटसाईडर असताना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात याविषयी सांगितलं.

सकाळशी बोलताना तिने सांगितलं की, “जेव्हा तुम्ही आउटसाइडर असता तेव्हा तुम्हाला सगळं शिकून घ्यावं लागतं. माझी आई अभिनेत्री नाही की माझे वडील निर्माते नाहीत. मला वाटतं की सगळ्या गोष्टीत मातब्बर असणं गरजेचं आहे. कधीही कुठूनही संधी मिळाली तर त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे.”

 “आऊटसाइडर असताना तुम्हाला सगळं शिकावं लागतं...”; नेपो किड्सना अदा शर्माचा टोमणा?
Adah Sharma: 'दहशतवादी खरे व्हिलन, मुस्लिम नव्हे..'; फ्रॉड म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अदा शर्माने सुनावलं!

गेल्या काही वर्षात बॉलीवुडमध्ये नेपोटीझम हा मुद्दा मोठ्या प्रमाणात सुरु होता. यातच कलाकारांच्या मुलांना चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी मिळताना दिसतेय. अदा शर्माचं या मनोरंजन क्षेत्रात कुणीही गॉडफादर नसल्याने शिवाय ती नेपो किड्स नसल्याने ती स्वत:ला आऊटसाइडर म्हणवते. कलाकार म्हणून ती स्वत:वर जास्तीत जास्त मेहनत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिने सांगितलय.

शिवाय मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छाही अदा शर्माने व्यक्त केली आहे.

ती म्हणते की, “माझा पहिला मराठी पुरस्कार आहे. मी मराठी मुलगीच आहे कारण लहानपणापासून मी मुंबईत राहते. मी जेव्हा मराठीत गाणी गाते आणि सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकते तेव्हा मराठी प्रेक्षक उत्सुक असतात, ते मला छान सहकार्य करतात आणि सांभाळून घेतात.”

मराठीच नाही तर इतर भाषिय चित्रपटांमध्येही अदाला काम करायचंय. ती सांगते की, “मी अभिनेत्री बनल्यानंतर ठरवलं होतं की भारतातील प्रत्येक भाषेत एक एक चित्रपट करायचं.”

अदा शर्माने आत्तापर्यंत तेलुगू, मल्याळम, हिंदी, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये काम केलय. तेव्हा मराठी भाषेतही काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. शिवाय मराठीत काम करण्याबद्दल सध्या चर्चाही सुरु असल्याचं गुपीत तिने यावेळी उलगडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.