VIDEO: 'गजगामिनी चाल' म्हणजे काय? अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aditi Rao Hydari Video Viral: हिरामंडी या वेब सीरिजमधील एका गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या वॉकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनी नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aditi Rao Hydari sakal
Updated on

Aditi Rao Hydari Video Viral: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या "हिरामंडी: द डायमंड बझार' (Heeramandi) या वेब सीरिजची सध्या चर्चा होत आहे. या वेब सीरिजचं अनेकजण कौतुक करत आहेत. या वेब सीरिजमधील विविध सीन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाताच हिरामंडी या वेब सीरिजमधील एका गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या (Aditi Rao Hydari) वॉकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आदितीच्या वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड

अदिती राव हैदरीनं हिरामंडी: द डायमंड बाजार या वेब सीरिजमध्ये बिब्बोजान ही भूमिका साकारली आहे. हिरामंडीमधील सैया हटो जाओ या गाण्यातील अदितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील अदितीच्या वॉकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या वॉकचं अनेकजण कौतुक करत आहेत. अदितीच्या या वॉकला 'गजगामिनी चाल' असं म्हणतात.

'गजगामिनी चाल' म्हणजे काय?

'गजगामिनी' या संस्कृत शब्दाचे भाषांतर 'हत्तीच्या चालप्रमाणे' असे होते, ज्याचा अर्थ 'शाही चाल' असाही होते. ही चाल हत्तीच्या चालीसारखी असते. ही चाल ग्रेस, फेमिनिटी आणि शक्तीचं प्रतिक मानली जाते.

पाहा व्हिडीओ:

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

अदितीच्या 'गजगामिनी' वॉकचं अनेकांनी सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,"मला अदितीची गजगामिनी चाल खूप आवडली, असं वाटलं की, ती मधुबाला बायोपिकसाठी ऑडिशन देत आहे."

अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनी नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल
Heeramandi : दारू पिऊन डान्स अन् 99 टेक्स; रिचाने सांगितला 'हिरामंडी'मधील गाण्यावरील नृत्याच्या शूटिंगचा किस्सा

'या' अभिनेत्रींनी चित्रपटात केली 'गजगामिनी चाल'

अदिती राव हैदरी आधी देखील काही अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये 'गजगामिनी चाल' केली आहे. माधुरी दीक्षितने 2000 मध्ये एमएफ हुसैन दिग्दर्शित 'गज गामिनी' या चित्रपटात ही चाल केली होती. शिवाय, 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील 'मोहे पनघाट पे' या गाण्यात मधुबालाने 'गजगामिनी चाल' केली होती.

अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनी नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल
Heeramandi The Diamond Bazar : ना सोनाक्षी ना मनीषा, 'या' व्यक्तीनं घेतलं सर्वाधिक मानधन; 'हिरामंडी' बजेट किती? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.