Kalki 2898 AD : कल्की 2898 AD मधील दीपिकाच्या त्या फायरवॉकची होतेय द्रौपदीशी तुलना ; नेटकरी म्हणतात...

Deepika Padukone Famous Scene In Kalki : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा कल्की सिनेमातील एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे
Deepika In Kalki
Deepika In Kalki Esakal
Updated on

Deepika Padaukone : प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला कल्की 2898 AD हा सिनेमा खूप गाजतोय. पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या या सिनेमातील अनेक सीन्स चर्चेत आहे. त्यातीलच दीपिकावर चित्रित झालेला एक सीन सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर हा सीन खूप गाजतोय.

'या' सीनची चर्चा

या सिनेमात दीपिकाचा आगीतून चालत येतानाचा एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत हा सीन पाहून त्यांच्या अंगावर काटा आल्याचं म्हंटलं आहे आणि या सीनमुळे आता दीपिकाचा आगामी बहुप्रतिक्षित सिनेमा द्रौपदी पुन्हा चर्चेत आला आहे.

पौराणिक नाटकावर हा सिनेमा आधारित असून दीपिका या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये तिने या व्यक्तिरेखेवर आधारित असलेल्या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि हा सिनेमा बनवण्याची ती योजना बनवत असल्याचं तिने म्हंटलं होतं पण त्यानंतर या सिनेमासंदर्भात कोणतीही अपडेट दीपिका किंवा तिच्या टीमकडून शेअर करण्यात आली नाही.

Deepika In Kalki
Kalki 2898 AD Box Office : कल्कीसाठी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद, सिनेमा पार करणार २०० कोटींचा आकडा ? ; अॅडव्हान्स बुकिंगमुळे साईट झाली क्रॅश

चाहत्यांची इच्छा

सोशल मीडियावर मात्र सध्या चर्चेत आलेल्या सीनमुळे पुन्हा दीपिकाने द्रौपदीवर सिनेमा बनवावा अशी मागणी तिच्या फॅन्सकडून करण्यात येत आहे. हा प्रोजेक्ट पुन्हा सुरु होईल अशी आशा अनेक फॅन्सनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. यातील एका युजरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंट करत म्हंटल कि," दीपिकाविषयी लिहिलेलं परीक्षण वाचून खूप आनंद झाला. अनेकजण तिच्या डोळ्याविषयी आणि चालण्याविषयी बोल्ट आहेत. त्यासाठीच माझी इच्छा आहे कि राजामौली, नाग अश्विन किंवा मणीरत्नम यांनी दीपिकाबरोबर द्रौपदी हा सिनेमा बनवावा." तर एकाने हा प्रोजेक्ट पुन्हा सुरु व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.

पद्मावत मधील 'तो' सीन चर्चेत

दीपिका आता पुन्हा द्रौपदी या सिनेमात काम करणार कि नाही हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, दीपिकाने घोषणा केलेल्या या सिनेमाची निर्मिती मधू मॉन्टेना करणार होते पण काही कारणामुळे हा प्रोजेक्ट स्थगित झाला.

या आधीही दीपिकाचा पद्मावत सिनेमातील जौहारचा सीन गाजला होता. या सीनमध्येही दीपिकाने तो गाजलेला फायरवॉक केला होता आणि आता कल्की मुळे हा सीनही चर्चेत आला होता.

Deepika In Kalki
Kalki 2898 AD Box Office: अरारारा खतरनाक! 'कल्की'ची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, मोडला KGF २ चा रेकॉर्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com