Alyad Palyad: सिनेमाच्या घवघवीत यशानंतर नवोदित अभिनेत्याने उलगडला त्याचा यशाचा प्रवास...

After the success of Alyad Palayad part one, now part two will soon hit the audience: 'कुठल्याही नवोदित कलाकारासाठी इतक्या लवकर चित्रपटाची संधी मिळणे खूप मोठी आणि खूप अवघड गोष्ट असते. ती संधी मला मिळाली'; अभिनेता भाग्यम जैन
alyad palyad marathi movie
alyad palyad marathi moviesakal
Updated on

निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर तसेच दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांच्या 'अल्याड पल्याड' या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. हॉरर-कॉमेडी असलेल्या या चित्रपटात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता या चित्रपटाचा 'अल्याड पल्याड २' नावाने सिक्वेल येत आहे. त्यानिमित्त अभिनेता भाग्यम जैन याच्याशी साधलेला संवाद...

Q

अभिनयाची सुरुवात केव्हा आणि कधी झाली ?

A

इयत्ता चौथीपासूनच मी अभिनयाला सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मी अभिनयाचे प्रशिक्षण घेत आलो आहे. अश्विनी तोले नावाच्या माझ्या एक शिक्षिका होत्या. त्यांनी मला अभिनयाचे प्रशिक्षण दिले होते. तीन वर्षे मी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मी नृत्याकडे वळलो आणि मग माझी दहावीची परीक्षा झाली. त्यानंतर दोन-तीन महिन्यांच्या सुटीत मी अभिनयाकडे लक्ष देण्याचे ठरवले. माझ्या घरातील सगळेच सतत म्हणायचे की तू अभिनय क्षेत्रात चांगले काम करू शकतोस. खरेतर माझ्या कुटुंबाने मला यात खूप मदत केली. त्यानंतर अकरावी आणि बारावी करत असतानाच माझ्या कुटुंबाने मला अभिनय क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आणि मी अॅक्टिंगमध्ये डिप्लोमा करायला सुरुवात केली. त्यादरम्यान माझी ओळख प्रीतम सरांसोबत झाली. त्यांच्याकडे तीन महिने अभिनय शिकलो आणि त्यानंतर मी चित्रपटसृष्टीत आलो.

alyad palyad marathi movie
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर रमले खास पत्रांच्या आठवणीत...
Q

अल्याड पल्याडसाठी कॅमेऱ्याचा पहिल्यांदा सामना करताना काही चलबिचल होती का?

A

चलबिचल तशी खूपच होती. कारण 'अल्याड पल्याड'मध्ये आमचे पहिले शूट डान्सचे होते. डान्सच्या बाबतीत माझ्यात आत्मविश्वास चांगला होता. त्यामुळे मला माहीत होते, की मी डान्स छान करू शकतो; पण कॅमेऱ्याचा सामना करण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे थोडी घाबरगुंडी उडाली होती. तेथे बरेच लोकही होते. खूप बॅकग्राऊंड डान्सर होते. कोरिओग्राफर होते आणि पहिले शूट माझे एकट्याचे होते. त्यामुळे जरा घाबरलो होतो; पण त्यानंतर मी सेट झालो आणि खूप छान शूट झाले व ते तुम्ही चित्रपटात पाहिलेच असेल. काम करताना खूप मजाही आली.

Q

दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी तुला जेव्हा हा चित्रपट ऑफर केला, तेव्हा तुझ्या मनात काय भावना होत्या ?

A

कुठल्याही नवोदित कलाकारासाठी इतक्या लवकर चित्रपटाची संधी मिळणे खूप मोठी आणि खूप अवघड गोष्ट असते. ती संधी मला मिळाली. जेव्हा मी हे ऐकले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. मी आधी ऑडिशनदेखील दिली होती. त्यामुळे संधी मिळेल किंवा नाही, अशी मनात भीती होती; पण जेव्हा पुन्हा ऑडिशन झाली आणि प्रीतम सर म्हणाले, की तुझी यात मुख्य भूमिका असेल... ते ऐकताच मी खूप भावूक झालो होतो. कारण इतक्या मोठ्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळणे ही खूपच मोठी गोष्ट होती. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा या सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या पहिल्याच चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.

alyad palyad marathi movie
Divorce News: नीलम-समीर वैवाहिक जीवनात खूश!
Q

तुझ्या पहिल्याच चित्रपटाला चांगले यश मिळाले, त्याबद्दल तू काय सांगशील?

A

खरे सांगायचे तर पहिल्या चित्रपटाला एवढे यश मिळाले त्याबद्दल मी खूप खुश आहे. आम्ही जी मेहनत घेतली त्या मेहनतीला प्रेक्षकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला. आमच्या मेहनतीचे चीज झाले असे मी म्हणेन. कारण मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन प्रकारात मोडणारा हा चित्रपट होता. त्याला यश मिळाले याचा आनंद खूप आहे. आता तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा झाली आहे. त्यामुळे खूप छान वाटत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी मी आतुर आहे.

Q

कुठल्याही नवोदित कलाकाराची अपेक्षा असते, की आपल्याला एखादी लव्हस्टोरी असेल, असा चित्रपट मिळावा; पण तू हा वेगळा जॉनर निवडलास. त्यामागचे कारण काय ?

A

पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही नवोदित कलाकाराला जर पहिल्या चित्रपटाची संधी मिळणार असेल, तर तो मुळातच सोडणार नाही; पण मी असे मानतो की हे खूप छान झाले की मला हॉरर-कॉमेडी जॉनरचा चित्रपट मिळाला. कारण, लव्हस्टोरी तर प्रेक्षकांना खूप बघायला मिळतात. आपण काय नवीन देऊ शकतो हे मी बघितले. कारण प्रेक्षकांना एखादा नवीन विषय चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळत असेल, तर ते आणखी आवडीने आणि उत्सुकतेने पाहतात. त्यामुळेच या वेगळ्या प्रकारातील चित्रपटाला यश मिळाले.

alyad palyad marathi movie
Ambani Wedding : अंबानीच्या लग्नात 'बिन बुलाए' घुसला युट्यूबर; मुंबई पोलिसांनी केला पाहुणचार
Q

तुला आणखी कुठल्या जॉनरमध्ये काम करायला आवडेल ?

A

मी असे काहीच ठरवलेले नाही, की मला याच जॉनरमध्ये काम करायचे आहे किंवा त्याच जॉनरमध्ये काम करायचे आहे. एक नवोदित कलाकार म्हणून मला वैविध्यपूर्ण भूमिका करायला आवडतील. जिथे मला असे वाटेल की मी या भूमिकेसाठी परफेक्ट आहे तिथे मी नक्कीच काम करेन. एखाद्या वेगळ्या भूमिकेसाठी आणखी मेहनत करायला माझी नेहमीच तयारी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()