Akshay Kumar: अक्षय कुमारच्या चित्रपटांचा यशाचा आकडा घसरला; प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका

Box Office Collection's latest Bollywood News: ‘मिशन राणीगंज’ही सपशेल आपटला. टायगर श्रॉफचा बिग बजेट ‘गणपत’देखील फ्लॉप ठरला.
Akshay Kumar: अक्षय कुमारच्या चित्रपटांचा यशाचा आकडा घसरला; प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका
Akshay Kumar:sakal

Bollywood Latest update: निर्माते वाशू भगनानी यांनी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या.

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या चित्रपटांचा यशाचा आकडा घसरला; प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका
Bollywood Actress : लग्नानंतर 'या' सुंदर अभिनेत्रींनी सोडली फिल्मी दुनिया; काहींनी पुनरागमन केलं, तर काहींनी..

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा तब्बल ३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. या चित्रपटाची रिलीजपूर्वी खूप चर्चा होती, पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करू शकला नाही. सिनेमा फ्लॉप झाल्याने भगनानी यांच्या पूजा एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या चित्रपटामुळे जे नुकसान झाले त्याचे २५० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वाशू भगनानी यांनी मुंबईतील ऑफिस विकल्याची माहिती समोर आली आहे

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या चित्रपटांचा यशाचा आकडा घसरला; प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका
Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

आर्थिक तोट्यामुळे त्यांनी प्रॉडक्शन हाऊसचे कर्मचारी कमी केले आहेत असे समजते आहे. मात्र अद्याप प्रॉडक्शन हाऊसने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे सर्व २०२१ मध्ये कोरोनाच्या साथीनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या हिंदी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘बेलबॉटम’पासून सुरू झाले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘मिशन राणीगंज’ही सपशेल आपटला. टायगर श्रॉफचा बिग बजेट ‘गणपत’देखील फ्लॉप ठरला.

इतकंच नाही तर डील झाल्यावरही एका ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला, त्यामुळे या कर्जात भर पडत गेली. मग प्रॉडक्शन हाऊसने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये गुंतवणूक केली, हा चित्रपट हिट झाल्यास परिस्थिती सुधारेल अशी आशा भगनानी यांना होती, पण चित्रपट फ्लॉप झाला आणि प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या चित्रपटांचा यशाचा आकडा घसरला; प्रॉडक्शन हाऊसला मोठा आर्थिक फटका
Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com