Twinkle Khanna On Rape Case : अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सध्या मिसेस फनीबोन्स नावाने सध्या अनेक लेख लिहीत असते. नुकतंच तिने "व्हाय घोस्ट्स डोन्ट स्केअर द इंडियन स्त्री' नावाचा लेख होता. या लेखात तिने भारतातील महिलांवर वाढलेले अत्याचार आणि देशात घडलेल्या बलात्काराच्या घटना यावर भाष्य केलं. या लेखाची सुरुवात ट्विंकलने तिच्या आजीच्या कथेपासून केली.
त्यानंतर तिने 'आपण आपल्या आजूबाजूला पाहत असलेल्या भयपटांपेक्षा चित्रपट माध्यमातील भयपट कसे कमी त्रासदायक असतात' हे उदाहरणासहित पटवून दिलं. यावेळी तिने तिच्या लेखात कोलकाता येथील डॉक्टरवर झालेला बलात्कार, बदलापूर येथील चार वर्षांच्या असलेल्या दोन मुलींबाबत घडलेली धक्कादायक घटना आणि इतर घटना यांचा उल्लेख केला.