Alia Bhatt: विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील, पण ही यादी कसली?

Blockout 2024 List: 'ब्लॉकआऊट' यादी नेमकी कशासाठी तयार करण्यात आली आहे? या यादीत आणखी कोणत्या सेलिब्रिटींची नावं आहेत? याबद्दल जाणून घेऊयात...
विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील? पण ही यादी कसली?
Alia Bhattsakal

Alia Bhatt name In Blockout 2024 List: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही ग्लोबल स्टार झाली आहे. आलियानं देशातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळवली. काही दिवसांपूर्वी तिनं मेट गाला-2024 या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी आलियानं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण आता आलिया ही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आलियाचं नाव ब्लॉकआऊट लिस्टमध्ये सामील झालं आहे. याआधी विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांचेही या लिस्टमध्ये नाव सामील झालं होतं. ही यादी नेमकी कशासाठी तयार करण्यात आली आहे? या यादीत आणखी कोणत्या सेलिब्रिटींची नावं आहेत? याबद्दल जाणून घेऊयात...

आलियाचं नाव का झालं ब्लॉकआऊट लिस्टमध्ये सामील?

आलियानं मेट गाला या कार्यक्रमात सब्यसाचीनं डिझाइन केलेली साडी नेसली होती. तिच्या लूकचं अनेकांनी कौतुक केलं. पण या कार्यक्रमात इस्रायल-गाझा युद्धाबद्दल मौन बाळगल्यानं आता आलियाचं नाव ब्लॉकआऊट लिस्टमध्ये सामील झालं आहे.

ब्लॉकआऊट लिस्टमध्ये 'या' सेलिब्रिटींची नावं

ब्लॉकआऊट लिस्टमध्ये विराट कोहली, प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, टेलर स्विफ्ट, बेयॉन्से, काइली जेनर, झेंडाया, मायली सायरस, सेलेना गोमेझ, एरियाना ग्रांडे, डेमी लोव्हाटो, कान्ये वेस्ट, केटी पेरी, झॅक एफ्रॉन, निक जोनास या इतर लोकप्रिय नावांचाही समावेश आहे. , केविन जोनास, जस्टिन टिम्बरलेक या कलाकारांच्या नावांचा देखील समावेश आहे.

ब्लॉकआऊट लिस्ट म्हणजे काय?

गेल्या काही महिन्यांपासून, ब्लॉकआऊट 2024 हे कॅम्पेन सोशल मीडियावर सुरु आहे. यामध्ये अशा सेलिब्रिटींबाबत बोललं जातं, ज्यांनी गाझा आणि इस्रायल यांच्यातील संघर्षावर मौन बाळगलं.या डिजिटल चळवळीत इस्रायल-गाझा यांच्यातील संघर्षाबद्दल मौन बाळगल्यामुळे सेलिब्रिटींचा विरोध केला जातो आणि त्या सेलिब्रिटींना ब्लॉक करण्याचे आवाहन नेटकऱ्यांकडे केले जाते.

विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील? पण ही यादी कसली?
Alia Bhatt Birthday: ताज हॉटेलमध्ये पार पडली आलियाची ग्रँड बर्थ-डे पार्टी; ईशा आणि आकाश अंबानीसह अनेक सेलिब्रिटींनी लावली हजेरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com