Alka Yagnik: धक्कादायक! अलका याज्ञिक यांना अचानक ऐकू येणं झालं बंद , व्हायरल अटॅकनंतर चाहत्यांना केली 'ही' विनंती

Alka Yadnik Update: गायिका अलका याज्ञिक यांना व्हायरल अटॅकमुळे ऐकू येणं बंद झालं आहे.
धक्कादायक! अलका याज्ञिक यांना अचानक ऐकू येणं झालं बंद , व्हायरल अटॅकनंतर चाहत्यांना केली 'ही' विनंती
Alka YagnyikSAKAL
Updated on

Alka Yagnik: बॉलिवूड मधील आघाडीच्या गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांना व्हायरल अटॅक मुळे ऐकू येणं बंद झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी दिली. त्यांना कानाशी संबधित दुर्मिळ आजार झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्यांचे चाहते त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थना करत आहेत.

अलका यांनी शेअर केलं कि एका व्हायरल अटॅकनंतर त्यांना ही समस्या सुरु झाली आहे. एके दिवशी विमानातून बाहेर येताना त्यांना काहीच ऐकू येत नाहीये असं जाणवलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि सह गायकांना लाऊड आवाजातील गाणी ऐकू नका अशी विनंती केली आहे

धक्कादायक! अलका याज्ञिक यांना अचानक ऐकू येणं झालं बंद , व्हायरल अटॅकनंतर चाहत्यांना केली 'ही' विनंती
Alka Yagnik: अलका याज्ञिकने रागाच्या भरात आमिरला रुममधुन लावलं होतं हाकलून...

अलका यांची पोस्ट

इंस्टाग्रामवर त्यांच्या समस्येविषयी बोलताना अलका असं म्हणाल्या कि,"माझे सगळे चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांनो,

काही आठवड्यांपूर्वी जेव्हा मी विमानाच्या बाहेर पडत होते तेव्हा मला अचानक जाणवलं कि मला काहीही ऐकू येत नाहीये. यानंतर बऱ्याचदा असं झालं. शेवटी मी हिंमत करून मला माझ्या चाहत्यांसाठी, फॉलोअर्ससाठी आणि मित्रांसाठी यावर माझं मौन सोडायचं आहे जे मी सध्या कुठेही अक्टिव्ह नसल्यामुळे चिंतेत आहेत.

माझ्या डॉक्टरांनी निदान केलं आहे कि मला एक दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस झाला आहे. जो एका व्हायरल अटॅकमुळे झाला आहे. या अचानक आलेल्या मोठ्या संकटामुळे मलाही धक्का बसला आहे. मी या आजाराला स्वीकारण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.

या बरोबरच मला सांगायला आवडेल कि, कृपया हेडफोन घालून लाऊड संगीत ऐकू नका. एक दिवस मला माझ्या प्रोफेशनल आयुष्यासंबंधी काही चांगल्या बातम्या नक्की शेअर करायला आवडतील. तुमचे आशीर्वाद आणि साथीमुळे मी लवकरच या आंजारून बरी होऊन परत येईन अशी मला आशा आहे. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणा या अतिशय गंभीर काळात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे."

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नाव

अलका फक्त बॉलिवूडचं नाही तर देशातील प्रसिद्ध गायिकांपैकी एक असून त्यांनी आतापर्यंत २५ पेक्षा जास्त भाषांमध्ये २१ हजारांपेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली आहेत. तसंच त्यांना दोन वेळेला राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. २०२२ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्डनुसार त्यांना सगळ्यात जास्त ऐकलेल्या गायिकांपैकी एक मानलं जातं.

धक्कादायक! अलका याज्ञिक यांना अचानक ऐकू येणं झालं बंद , व्हायरल अटॅकनंतर चाहत्यांना केली 'ही' विनंती
Alka Kubal: अलका कुबल लेकीसोबत येरवडा तुरुंगात दाखल, हे आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.