Amar Singh Chamkila: अख्ख्या पंजाबला तालावर नाचवलं, अश्लील गाण्यांचा आरोप अन् हत्या; विचार करायला लावणारा 'अमर सिंह चमकीला'

Amar Singh Chamkila: इम्तियाज अलीचा हा आणखी एक मास्टरपीस आहे, असं म्हणता येईल. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम जर बारकाईनं पाहिली तर त्या इम्तियाज अलीची जादू दिसते.
अख्ख्या पंजाबला तालावर नाचवलं, अश्लील गाण्यांचा आरोप अन् हत्या; विचार करायला लावणारा 'अमर सिंह चमकीला'
Amar Singh Chamkilaesakal
Updated on

Amar Singh Chamkila: इम्तियाज अली (Imtiaz Ali) या बॉलिवूडमधील जादूगाराच्या पिटाऱ्यातून आणखी एक अविष्कार प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या अविष्काराचं नाव 'अमर सिंह चमकीला'. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. एका गायकाच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट बरंच काही सांगून जातो आणि विचार करायला भाग पाडतो. इम्तियाज अलीचा हा आणखी एक मास्टरपीस आहे, असं म्हणता येईल. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम जर बारकाईनं पाहिली तर त्या इम्तियाज अलीची जादू दिसते. या चित्रपटात काय खास आहे? या चित्रपटाचं कथानक काय आहे? हा चित्रपट विचार करायला का लावतो? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न या रिव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घेऊयात...

चित्रपटाचं कथानक

पंजाबमधील प्रसिद्ध दिवंगत गायक अमर सिंह चमकीलावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे. अमर सिंह चमकीलाची कथा पंजाबच नाही तर देशभरातील अनेकांना माहित असेल. अमर सिंह चमकीला आणि त्याची पत्नी अमरज्योत सिंह या दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर अश्लील गाणी गाण्याचा आरोप त्याकाळी अनेकांनी केला होता. अवघ्या 27 वर्षीय चमकीलाला आणि त्याच्या पत्नीला भर दिवसा गोळ्या घालून मारण्यात आलं. अमर सिंह चमकीनं भारतातच नाही तर जगभरात ओळख निर्माण केली. त्याला पंजाबचा 'एल्विस' असंही म्हटलं जात होतं. आजही अनेक त्याची गाणी आवडीनं ऐकतात. चित्रपटात देखील तेच दाखवलं आहे. एका कलाकाराला मारलं तरी त्याची कला मरत नसते. चित्रपटाच्या कथानक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. पण चित्रपटात दाखवलेल्या खऱ्या चमकीलाचे व्हिडीओ पाहून आपण 80 च्या दशकात खरंच गेलो आहोत, असं वाटतं.

दिलजीतचा मन जिंकणारा अभिनय तर परिणितीही चमकली

दिलजीतनं त्याच्या नावाप्रमाणेच प्रेक्षकांचे हृदय जिंकलं आहे. दिलजीतनं अमर सिंह चमकीला हुबेहूब साकारला आहे. त्याचं चालणं, बोलणं, गाणं गायची पद्धत सर्वकाही अमर सिंह चमकीला सारखे आहे. जेव्हा चित्रपटात खऱ्या अमर सिंह चमकीलाचा व्हिडीओ आणि दिलजीतचा चित्रपटातील सीन दाखवला जातो, तेव्हा चित्रपटातील भूमिकेसाठी दिलजीतनं घेतलेली मेहनत दिसून येते. परिणितीनं देखील चित्रपटात चांगलं काम केलं आहे. चित्रपटातील तिनं गायलेली गाणी देखील तुमची मनं जिंकतील.

विचार करायला लावणारा 'अमर सिंह चमकीला'

अमर सिंह चमकीलाबाबत आणि त्याच्या गाण्यांबाबत आजही अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण अमर सिंह चमकीला हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक विचार मनात येतात. अमर सिंह चमकीला या काळात जन्मला आला असता, तर काय झालं असतं? त्याच्यावर अश्लील गाणी तयार करण्याचा आरोप अनेकांनी केला होता पण ज्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर चमकीला चित्रपट रिलीज झाला आहे, त्याच प्लॅटफॉर्मवर अनेक 'सो कोल्ड' अडल्ड सीन्स असणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट बरेच आहेत. तो कंटेन्टतर लोक आवडीनं बघत आहेत, मग या काळात चमकीला असला असता तरीही त्याची हत्या झाली असती का? अश्लीलतेची नेमकी व्यख्या काय? कलाकाराला कला मांडण्यासाठी बंधनं असावीत का? असे बरेच विचार हा चित्रपट पाहिल्यानंतर पडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.