Like And Subscribe Movie Review: तरुणाई आणि सोशल मीडियाला जोडणारा धागा म्हणजे 'लाईक आणि सबक्राईब'

Like And Subscribe Marathi Movie Review: सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियामध्ये लाईक आणि सबक्राईबला अतोनात महत्त्व आलेले आहे. त्यातून ही कथा उत्तमरीत्या गुंफलेली आहे.
like and subscribe movie review
like and subscribe movie reviewesakal
Updated on

एखाद्या चित्रपटाचा टीझर वा ट्रेलर पाहिल्यानंतर त्या चित्रपटाच्या बाबतीत कमालीची उत्सुकता लागते. चित्रपटामध्ये नेमके काय असेल...कशा प्रकारे कथेची मांडणी असेल वगैरे वगैरे. लाईक आणि सबक्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाच्या बाबतीत अशीच उत्सुकता लागलेली होती. कारण चित्रपटाच्या ट्रेलरने या चित्रपटातील रहस्य अधिक गडद केले होते आणि चित्रपट पाहताना हे रहस्य जेव्हा क्लायमॅक्सला उघड होते तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओतून गुंफलेली ही कथा आहे. सध्याच्या तरुणाईला समोर ठेवून बांधलेली ही कहाणी आहे. कारण सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियामध्ये लाईक आणि सबक्राईबला अतोनात महत्त्व आलेले आहे. त्यातून ही कथा उत्तमरीत्या गुंफलेली आहे.

खुशी (जुही भागवत) आणि श्रुती (राजसी भावे) या दोघी मैत्रिणी असतात. मुंबईत भाड्याच्या घरामध्ये त्या राहात असतात. खुशी ही स्ट्रगलिस्ट कलाकार असते तर श्रुती हीदेखील लेखिका म्हणून स्ट्रगल करीत असते. त्या दोघीही आपापल्या परीने स्ट्रगल करीत असतात. खुशी ही आपल्या दररोजच्या घडामोडी लाईव्ह व्लाॅगरद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवीत असते. एके दिवशी सायंकाळी ती समुद्रकिनाऱ्यावर लाईव्ह व्लाॅगिंग करीत असते. त्यावेळी तिला तेथे एक पिशवी दिसते. त्या पिशवीत काही वस्तू तिला दिसतात. त्या वस्तू पाहात असताना तिला त्या व्यक्तीचा पत्तादेखील सापडतो. तो पत्ता असतो रोहित (अमेय वाघ) नावाच्या तरुणाचा.

मग खुशी ती पिशवी घेऊन त्या तरुणाच्या घरापर्यंत कशीबशी पोहोचते. घरामध्ये पोहोचताच तिला मोठा धक्काच बसतो. कारण तो तरुण तिला मृत अवस्थेत दिसतो आणि हे सगळं लाईव्ह व्लाॅगिंगद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचलेले असते. मग सुरू होतो पोलिस चौकशीचा ससेमिरा. त्यानंतर एनजीओसाठी काम करणारी दीपिका (अमृता खानविलकर) खुशीला काय आणि कशी मदत करते..रवी (शुभंकर तावडे) याची नेमका काय निर्णय घेतो.. या खुनामागे नक्की कोण दडलेले असते. खून करण्यामागचे नेमके कारण काय असते... याच प्रश्नांच्या उत्तरासाठी हा रहस्यमय चित्रपट पाहावा लागेल. दिग्दर्शक अभिषेक मेरूकरने ही कथा मांडताना चांगले टर्न आणि ट्विस्ट दिले आहेत. चित्रपटाचा प्लाॅट नवा आहे आणि दिग्दर्शकाने त्याची मांडणी छान केली आहे.

त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा झाला आहे. आजच्या सोशल मीाडियाच्या जमान्यामध्ये लाईक आणि सबक्राईबला अत्यंत महत्त्व असले तरी त्याचा अतिरेक होऊ नये हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक म्हणून अभिषेकचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने नावीन्यपूर्ण विषयाला हात घातला आहे. अमेय वाघने आपल्या भूमिकेत चमकदार कामगिरी केली आहे. इन्शुरन्स पाॅलिसी उतरविणाऱ्या रोहित-रोहिदासच्या भूमिकेमध्ये त्याने उत्तम रंग भरलेले आहेत. अमृता खानविलकरची भूमिका नाॅन ग्लॅमरस अशी आहे. पण तिनेदेखील कथेला साजेशी अशी भूमिका उत्तम वठविली आहे. विठ्ठल काळे, शुभंकर तावडे, पुष्कराज चिरपूटकर राजसी भावे आदी कलाकारांनी उत्तम कामगिरी केली आहे.

परंतु अधिक कौतुक करावे लागेल ते जुही भागवतचे. एक स्ट्रगलिस्ट अभिनेत्री आणि व्हिडीओ व्लाॅगर खुशी या भूमिकेत चांगले रंग भरलेले आहेत. सहजसुंदररीत्या तिने ही भूमिका साकारली आहे. पुष्कराज चिरपूटकरच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आले आहेत. त्याने ते उत्तम साकारले आहेत. क्षितीज पटवर्धनच्या गाण्यांना संगीतसाज अमित राज व सुयश केळकरने उत्तम चढविला आहे.

गौतमी पाटीलचे नृत्य हे या चित्रपटाचे एक आकर्षण आहे. गौरव कुलकर्णीच्या कॅमेऱ्याने आपली जादू दाखविली आहे. मात्र या चित्रपटामध्ये काही अतार्किक बाबी आहेत. त्या मनाला पटत नाहीत. तरीही निर्माते नितीन प्रकाश वैद्य आणि अभिषेक मेरूकर यांनी एक नावीन्यपू्र्ण विषय हाताळला आहे. या चित्रपटातील रहस्य शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

like and subscribe movie review
Prajakta Mali: जवळच्या माणसांनीच फसवणूक केली; प्राजक्ता माळीने सांगितला कठीण काळ, म्हणाली- आईने तर घर विकायला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.