Anant-Radhika Wedding: आठ लाखाचा लेहंगा, आठवडाभर चाललेल्या पंगती अन् रात्रभर केलेली आतिषबाजी..; हे होतं मुघलकालीन सर्वात महागड लग्न

दाराच्या लग्नाची भारतभर चर्चा झाली होती आणि इतर देशांतील महाराजांपर्यंत पोहोचली होती.
Anant-Radhika Wedding
Anant-Radhika WeddingESAKAL
Updated on

 Anant-Radhika Wedding: 

भारतातलं सगळ्यात महागड लग्न सध्याच्या घडीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच आहे. सोशल मिडियावर सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा आहेत. या शाही विवाहासाठी लग्न प्रत्रिका, जेवणाचे मेन्यू आणि सर्वच गोष्टी पारखून निवडण्यात आल्या आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? भारतातलं सर्वात शाही लग्न कोणतं होतं.

आज अनंत-राधिकाच्या शाही विवाहाच्या पार्श्वभुमीवर आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत लग्न कोणंत होतं याबद्दल जाणून घेणार आहोत.  (Anant-Radhika Wedding)

Anant-Radhika Wedding
Anant Radhika Wedding: लेक निघाली सासरला! अनंतला हार घालताच भरून आले राधिकाच्या वडिलांचे डोळे; मुलीवरची माया रडूही देईना

भारतात १६ व्या शतकात एक शाही विवाह सोहळा पार पडला होता. त्या विवाह सोहळ्यात एक-दोन नव्हे तर तब्बल आठवडाभर पंगती पडल्या होत्या. कोणतं होत ते लग्न आणि काय होते त्यातील शाही विधी याबद्दल जाणून घेऊयात.

मुघल बादशहाचा मुलगा दारा शिकोह आणि नादिरा यांचा विवाह १६ व्या शतकात पार पडला होता. मुघलांच्या इतिहासातील हा सर्वात महागडा विवाह होता. दारा आणि नादिरा यांचा विवाह १६३३ मध्ये संपन्न झाला होता.

Anant-Radhika Wedding
Anant Radhika Wedding: रिलायन्स कर्मचाऱ्यांचीही झाली चांदी! अनंत राधिकाच्या लग्नानिमित्त मिळाल्या खास भेटवस्तू, शेअर केले व्हिडिओ

दारा शिकोह हे बादशहा शाहजहान यांचे आवडते असण्यासोबतच त्यांच्या बहिणीचेही आवडते होते. आई मुमताज यांच्या निधनानंतर बहिण जहांआरा दाराला आईप्रमाणेच प्रेम करत होती.

मुमताज यांच्या मृत्यूनंतर, दाराचा विवाह हा मुघल घराण्यातील पहिला आणि सर्वात मोठा कार्यक्रम होता. मुघल सम्राट आणि बहीण जहाँआरा यांना ते भव्य बनवण्यात कोणतीही कसर सोडायची नव्हती. त्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली होती.

Anant-Radhika Wedding
Anant Radhika Wedding : 'बेबी काम डाउन' सिंगर रेमा मुंबईत दाखल, अनंत - राधिकाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी घेतले इतके कोटी

अनेक महिने सुरू होती सजावट

विवाह सोहळ्यासाठी महल सजावटीची प्रक्रिया अनेक महिने सुरू होती. लग्नसोहळ्यानिमित्त रात्रभर फटाके फोडण्यात आले. ही मेजवानी ८ दिवस चालली होती. दाराच्या लग्नाची भारतभर चर्चा झाली होती आणि इतर देशांतील महाराजांपर्यंत पोहोचली होती.

लग्नाचा संपूर्ण खर्च ३२ लाख रुपये होता. त्यातील निम्मी रक्कम म्हणजेच १६ लाख रुपये बहिण जहाँआराने दिले होते. लग्नाच्या तयारीसाठी कपड्यांवरही बराच खर्च करण्यात आला.

दाराच्या बेगमने लग्नाच्या दिवशी घातलेला लेहेंगा त्यावेळी ८ लाख रुपये होता. त्या लग्नाच्या चर्चेत लेहेंगाचीही चर्चा होती. कारण त्या काळातील आठ लाख म्हणजे आत्ताचे अज्बावधीच म्हणावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.