Laapataa Ladies: 25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची किरण रावनं केली कॉपी? अनंत महादेवन यांचा मोठा दावा,'लापता लेडीज'च्या लेखकानं दिलं स्पष्टीकरण

Ananth Mahadevan: अनंत महादेवन (Ananth Mahadevan) यांनी आरोप केला आहे की, किरण रावचा लपता लेडीज हा चित्रपट त्यांच्या 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'घुंगट के पट खोल' (Ghoonghat Ke Pat Khol) या चित्रपटातून कॉपी केला आहे.
25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची किरण रावनं केली कॉपी? अनंत महादेवन यांचा मोठा दावा,'लापता लेडीज'च्या लेखकानं दिलं स्पष्टीकरण
Laapataa LadiesSAKAL
Updated on

Laapataa Ladies: किरण रावच्या (Kiran Rao) लापता लेडीज (Laapataa Ladies) या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटातील कलाकारांचे देखील अनेकांनी कौतुक केलं आहे. अशातच आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अनंत महादेवन (Ananth Mahadevan) यांनी आरोप केला आहे की, किरण रावचा लपता लेडीज हा त्यांच्या 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'घुंगट के पट खोल' (Ghoonghat Ke Pat Khol) या चित्रपटातून कॉपी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. काही नेटकरी आनंत यांना पाठिंबा देत आहेत.

निवेदिता शुक्ला यांचे ट्वीट

लेखिका निवेदिता शुक्ला यांनी अनंत महादेवन यांना पाठिंबा दिला आहे. नुकतेच त्यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दोन्ही चित्रपटांचे पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “पूर्वी मी लापता लेडीजचे कौतुक केले होते, आणि आता नेटफ्लिक्सवरील अॅनिमलच्या व्ह्यूजला मागे टाकण्यासाठी त्या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. पण अनंत महादेवन यांच्या 'घुंगट के पट खोल' वरून हा चित्रपट कॉपी केला गेला आहे, हे मला फारसे माहीत नव्हते. हा चित्रपट पहिल्यांदा 1999 मध्ये दूरदर्शन गोल्डवर डायरेक्टर्स कट सहित प्रसारित झाला.”

निवेदिता शुक्ला यांनी पुढे ट्वीटमध्ये लिहिलं, "आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 'घुंगट के पट खोल' हा चित्रपट लापता लेडीज रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवरुन काढण्यात आला."

अनंत महादेवन यांचा आरोप

अनंत महादेवन यांचे मत आहे की, लापता लेडीज या चित्रपटाचे कथानक आणि घुंगट के पट खोल या चित्रपटाचे कथानक सारखेच आहे, दोन्ही चित्रपटांचे कथानक नववधूंच्या भोवती फिरतात. एका मुलाखतीत अनंत म्हणाले, “मी लापता लेडीज पाहिला आहे आणि चित्रपटाची सुरुवात आणि त्यातील घटना सारख्याच आहेत. माझ्या चित्रपटात शहरातील एक मुलगा लग्नासाठी त्याच्या गावी जातो. घुंगटात असलेल्या आपल्या नववधूला बेंचवर बसायला सांगितल्यावर, रेल्वे स्थानकावर घोळ होतो. तिथे परत आल्यावर तो चुकीच्या वधूला घेऊन जातो. नंतर कथा दोन स्त्रियांभोवती फिरते."

25 वर्षा पूर्वीच्या चित्रपटाची किरण रावनं केली कॉपी? अनंत महादेवन यांचा मोठा दावा,'लापता लेडीज'च्या लेखकानं दिलं स्पष्टीकरण
Laapataa Ladies OTT Release: किरण रावचा 'लापता लेडीज' ओटीटीवर झाला रिलीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

लापता लेडीजच्या लेखकानं दिलं स्पष्टीकरण

अनंतनं आरोप केल्यानंतर लापता लेडीजचे लेखक बिप्लब गोस्वामी यांनी सांगितले होते की, त्यांनी 2018 मध्ये सिनेस्तान इंडियाच्या स्टोरीटेलर्स कॉन्टेस्टमध्ये स्क्रिप्ट सादर केली होती आणि ही त्यांची कथा मूळ आहे. ते म्हणाले, “मला त्यासाठी प्रथम उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळाले. मी एक दशकापूर्वी सारांश लिहिला होता. माझी कथा, पटकथा, संवाद, व्यक्तिरेखा आणि दृश्ये सर्व 100 टक्के मूळ आहेत. मी कोणत्याही कथा, चित्रपट किंवा कादंबरीतून प्रेरित झालो नाही.”

पुढे बिप्लब गोस्वामी यांनी सांगितलं, “मी अनंत महादेवन यांचा चित्रपट पाहिला नाही. माझा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कादंबरी, नौकाडुबीपासून प्रेरित आहे का? असेही मला अलीकडेच विचारण्यात आले. एका 60 वर्षीय निर्मात्याने मला चित्रपटाच्या रिलीजच्या खूप आधी फोन केला होता की, त्याच्या आईसोबत ती वधू असताना असाच एक प्रसंग घडला होता. मी कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी असताना लैंगिक भेदभाव, खेड्यांतील असमानता आणि पुरुषी अराजकता या विषयांवर अभ्यास केला आहे. मला लेखनाची मूलभूत नैतिकता आणि नैतिकता शिकवली गेली आहे. त्यामुळे मी दुसऱ्याच्या कथेची कॉपी करणार नाही,”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.