Bollywood Entertainment News : एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या आशयघन आणि कमाल सिनेमांनी स्वतःचं स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता त्यांच्या सिनेमांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींमुळे चर्चेत राहतात. पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा चर्चेत यायचं कारण ठरलंय एक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध अपमानजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.