बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व नुकतच संपलय आणि बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी सूरज चव्हाणच्या हाती आली. सूरज चव्हाण हा यंदाच्या बिग बॉस मराठीचा विजेता ठरलाय. सोशल मिडीयावर सूरजचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतय तर दुसरीकडे सिम्पथीमुळे सूरज विजेता बनला अशीही चर्चा सुरुय. पण सूरजच्या निरागस स्वभावाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर यातच सूरजची तुलना आता रानू मंडलशी होऊ लागलीय. रेल्वेस्थानकावर गाणी गाऊन रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ती विविध रिएलिटी शोमध्ये झळकली होती. मात्र तिच्या वागणुकीमुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. सूरजच्या बाबतीत हे होऊ नये याची अनेकांना काळजी वाटतेय. बिग बॉस मराठीची स्पर्धक आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावकरलाही सूरजच्या याबाबतीत काळजी वाटतेय.