हिंसा होण्यासारखं काही नाही... वादग्रस्त 'हमारे बारह'ला न्यायालयाचा मोठा दिलासा; प्रदर्शनाला मंजुरी

Humare Barah Release: 'हमारे बारह' या चित्रपटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय सुनावला आहे.
hamare barah movie release
hamare barah movie releasesakal
Updated on

Humare Barah Release Date: अभिनेते अन्नू कपूर यांच्या 'हमारे बारह' या चित्रपटाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शनाचा रस्ता मोकळा झाला आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात काहीही हरकत नाही असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. मात्र त्यांना चित्रपटात काही बदल करावे लागणार आहेत. निर्मात्यांनी चित्रपटात बदल करण्यास होकार दिल्यावर याचिकाकर्त्यांनी देखील प्रदर्शनाला विरोध न करण्याचं मान्य केलं आहे. आज दीड वाजता याबद्दल आदेश काढण्यात येणार आहेत.

नेमकं काय म्हणाले न्यायमूर्ती

मुंबई हायकोर्टाने मंगळवारी निकाल देताना म्हटलं, अन्नू कपूर यांची 'हमारे बारह' हा चित्रपट न्यायालयाने पाहिला. आणि त्यांना या चित्रपटात कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही. हा चित्रपट कुराण किंवा मुस्लीम समुदायाच्या विरोधात आहे किंवा यामुळे हिंसा होऊ शकते असं काहीही चित्रपटात दिसलं नाही. हा चित्रपट महिलांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या दबलेल्या आवाजावर भाष्य करतो. या चित्रपटाचा ट्रेलर वेगळ्या पद्धतीचा असल्याने या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भरावा लागेल दंड

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बीपी कोलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकीट मिळण्याच्या आधीच ट्रेलर प्रदर्शित केल्याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांना दंड भरावा लागणार आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून हा चित्रपट २१ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

hamare barah movie release
एकटा जीव..! नवऱ्याला सोडून एकटीच डोंगरात फिरतेय लोकप्रिय मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.