तिची काहीच चूक नाही! अनुरागच्या 'त्या' वक्तव्यामुळे अमृता सुभाष झाली ट्रोल; आता स्पष्टीकरण देत म्हणाला....

Anurag Kashyap: बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने एका मुलाखतीत अमृता सुभाषचा एक किस्सा सांगितला होता.
amruta subhash
amruta subhashsakal
Updated on

Amruta Subhash: बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप याची एक मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री अमृता सुभाष हिच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. मात्र त्या मुलाखतीवरून नेटकरी आता अमृताला उगीच ट्रोल करू लागले आहेत. ज्यामुळे तिला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता अनुरागने पुढे येत अमृताची पाठराखण करत तिची यासगळ्यात काहीही चूक नसल्याचं सांगितलं.

मुलाखतीत अनुराग म्हणालेला, मी माझ्यासमोर नखरे करणाऱ्या किंवा अवास्तव मागण्या करणाऱ्या कलाकारांना थेट बाहेरचा रस्ता दाखवतो. त्यानंतर त्याने अमृताचा किस्सा सांगितला होता की तिच्या मॅनेजरने तिच्या वतीने कशा अती मागण्या केल्या होत्या आणि त्यामुळे त्याने तिला चित्रपटातून काढून टाकलेलं. मात्र ही मुलाखत अर्धवट वाचून नेटकरी आता तिला ट्रोल करू लागले आहेत. त्यामुळे अनुरागने एक पोस्ट करत सगळ्यांचा गैरसमज दूर केला आहे.

anurag kashyap
anurag kashyap sakal

अनुरागने पोस्ट करत लिहिलं, 'माझी मुलाखत पाहून अनेक लोक माझी जवळची मैत्रीण अमृता सुभाष हिला ट्रोल करत आहेत. ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे की मी ते फक्त एक उदाहरण म्हणून दिलं होतं. आमच्यामध्ये आजही एकमेकांबद्दल तेवढाच विश्वास आणि प्रेम आहे. 'चोक्ड' या चित्रपटासंदर्भात ही गोष्ट झाली होती आणि तिने त्यात अप्रतिम काम केलं होतं. यात चूक मॅनेजरची आणि एजन्सीची होती ज्यांनी तिच्या वतीने अवास्तव मागण्या केल्या होत्या. पण तिला स्वतःलाच याबद्दल काही कल्पना नव्हती. तिने लगेचच विचारणा करत गैरसमज दूर केला होता त्यानंतर तिने ती एजन्सीदेखील सोडली.'

अनुरागने अमृताला ट्रोल करणाऱ्यांना सुनावत हे स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यावर अमृतानेदेखील पोस्ट केल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

amruta subhash
Munjya On Ott: गोट्याचं भूत आता प्रेक्षकांच्या घरी येणार; थिएटरनंतर 'या' OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार 'मुंज्या'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.