Arjun Kapoor : कपूर कुटूंबाने थाटात साजरा केला अर्जुनचा वाढदिवस ; "माझा सगळ्यात मोठा चिअरलीडर..." अंशुलाने केली खास पोस्ट

Arjun Kapoor Birthday Celebration : अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस असून त्याच्या कुटूंबाने त्याचा वाढदिवस थाटात साजरा केला.
Arjun Kapoor
Arjun Kapoor Esakal
Updated on

Arjun's Video Viral : अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) आज म्हणजे २६ जूनला वाढदिवस असून सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अर्जुनचा (Arjun Kapoor) हा ३९ वा वाढदिवस असून संपूर्ण कपूर कुटूंबाने एकत्र येत त्याचा वाढदिवस थाटात साजरा केला. अर्जुनची बहीण अंशुलाने (Anshula Kapoor) सोशल मीडियावर अर्जुनचे लहानपणीचे खास फोटो आणि बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अंशुलाची पोस्ट

अंशुलाने सोशल मीडियावर तिच्या भावाला पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली,"माझ्या आयुष्यातील पहिल्या व्यक्तीला खूप शुभेच्छा.
माझा खंबीर संरक्षक, मला त्रास देणारी पहिली व्यक्ती, माझ्याबरोबर कुस्ती खेळणारा सहकारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, माझी सगळी स्वप्नं पूर्ण करणारा व्यक्ती ज्याचं हृदय विशाल आहे. माझी तुझ्यासाठी पहिली इच्छा हिच आहे कि, तू स्वतःवर विश्वास ठेवणं, खचून न जाता पुन्हा नवी सुरुवात करणं कधी सोडणार नाहीस. तुझं आयुष्य कसं असावं याबाबत तू पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होतंय आणि तुझ्या चिंता आता कमी होत आहेत. तू आता अधिक मोकळेपणाने हसतोयस, तुझं हास्य आता अजून मोठं झालंय आणि आता तुला सगळ्या चिंतांचा भार स्वतःवर उचलण्याची गरज नाही. तुझ्या आत असलेली आग कधीच विझणार नाही पण तुला कायमच बळ देईल अशी मी आशा करते. एक दयाळू माणूस कसा असावा याचं उदाहरण तू मला दाखवून दिलंस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, माझी स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी, मला आधार देण्यासाठी आणि माझ्या पडत्या काळात मला सउभं करण्यासाठी खूप खूप आभार. जगातील सगळ्या बेस्ट गोष्टी, सगळे सुख, सगळं प्रेम तुला मिळायला हवं. "

याबरोबर तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय कपूर, त्यांची पत्नी महिप कपूर, त्यांची मुलं , अंशुला आणि वरुण धवन यांनी हजेरी लावली होती. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Arjun Kapoor
Malaika Arora & Arjun Kapoor Breakup: मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप; नातं का संपलं?

पण अर्जुनची गर्लफ्रेंड मलायकाने मात्र त्याच्या वाढदिवसाला हजेरी लावली नाही त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर काहींनी अर्जुनचं कुटूंब उपस्थित असल्यामुळे तिने येणं टाळलं असावं अशी चर्चा रंगलीये.

Arjun Kapoor
Malaika Arora & Arjun Kapoor : "ते अजूनही एकत्र"; ब्रेकअपच्या चर्चांवर मल्लिकाच्या मॅनेजरने केला खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.