अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात होते. ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच अनुष्का शर्मा मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. .यादरम्यान, अभिनेत्रीने पती विराट कोहलीसोबत मुलांचे पालकत्व करताना कोणती आव्हाने येतात, याबद्दल बोलली. अकाय आणि वामिका या दोन मुलांची अनुष्का आई आहे. अनुष्का म्हणाली, ‘‘परफेक्ट होण्यासाठी आमच्यावर खूप दबाव असतो; पण आम्ही तसे नाही. स्वतःच्या चुका मान्य केल्याने मुलांचा ताण कमी होतो.’’ .अनुष्का पुढे म्हणाली, ‘‘कल्पना करा की जर मुले मानू लागली की त्यांचे पालक नेहमीच बरोबर असतात, तर त्यांच्यावरदेखील परफेक्ट होण्याचा दबाव असेल.’’ याशिवाय अनुष्काने मुलं झाल्यानंतर तिच्या सामाजिक जीवनात कसे बदल झाले, याबद्दलही सांगितले. .अनुष्का म्हणाली की, ‘‘मी फक्त आपल्यासारख्या लोकांसोबतच हँगआउट करते. जेव्हा लोक आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करतात तेव्हा मी शक्यतो ते टाळते.’’ २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात अनुष्का शाहरुख खानसोबत दिसली होती, आता ती भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्स्प्रेस’च्या रिलीजची वाट पाहत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.