Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एक कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. गेल्या काही काळापासून अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. पण याबाबत त्या दोघांकडूनही स्पष्टीकरण आलं नव्हतं. पण अखेर एका कार्यक्रमात अर्जुन कपूरने त्यांचा ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.