Payal Malik : "अरमान मला घटस्फोट हवाय" ; 'या' गोष्टीला कंटाळून अखेर पायलने केली घटस्फोटाची मागणी

Payal Malik declared her decision about divorce : दोन बायकांबरोबर संसार करत असल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या अरमान मलिकच्या पहिल्या बायकोने पायलने ती त्याच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलं.
Payal Malik
Payal MalikEsakal
Updated on

Armaan Malik & Family : बिग बॉस ओटीटी सीजन ३ मध्ये सहभागी झाल्यापासून अरमान मालिका आणि त्याचं कुटूंब चर्चेत आहे. एकापेक्षा अधिक विवाह केल्यामुळे अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकाला टीकेचा सामना करावा लागतोय. सुरुवातीला पायल मलिकला बिग बॉसच्या घरातून आणि प्रेक्षकांकडून खूप सहानुभूती मिळाली मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकजण तिला ती अरमानला सोडत का नाहीत म्ह्णून ट्रोल करत आहेत. याला कंटाळून पायलने अरमानला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला.

पायल मलिकने शुक्रवारी तिच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्लॉगमध्ये ट्रोल होण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पायल म्हणाली की, हा मुद्दा फक्त तिच्यापुरता मर्यादित राहिला असता तरबरं झालं असतं पण लोक आता त्यांच्या मुलांनाही ट्रोल करत आहेत. याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत आहे. यामुळे तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.ती व्हिडिओमध्ये असं म्हणाली कि,"या सगळ्या नाटकाला आणि द्वेषाला मी कंटाळले आहे. जोपर्यंत ते माझ्याबद्दल होतं तोपर्यंत ते ठीक होतं, परंतु आता ते माझ्या मुलांबद्दल आहे. हे धक्कादायक आणि घृणास्पद आहे. याच कारणामुळे मी अरमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तो कृतिकासोबत राहू शकतो आणि मी मुलांची काळजी घेईन."

पुढे ती असंही म्हणाली कि,"मला माहित आहे की गोलू जैदशिवाय राहणार नाही, म्हणून कदाचित ती त्याला तिच्याकडे ठेवेल आणि मी माझ्या तीन मुलांसह जाईन. लोक आमच्या अधिक विवाहांमुळे आनंदी नाहीत आणि मी यापुढे द्वेष सहन करू शकत नाहीत. हे मला खूप त्रास देत आहे. एकतर आपण तिघे वेगळे राहूया किंवा दोघे एकत्र राहून मी निघून जाईन असं होऊ शकतं." याशिवाय घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ती ठाम असून ती तिच्या मुलांसाठी हे सगळं करतेय असं ती म्हणाली.

Payal Malik
Bigg Boss OTT 3 स्पर्धक विशाल पांडेला अरमान मलिकनं का मारली थप्पड? का आला त्याला इतका राग?

आता पायल, अरमान आणि कृतिका खरंच वेगळे होणार कि हा ही पायलचा सहानुभूतीसाठी एखादा ड्रामा आहे हे काही काळात समजेल. दरम्यान, बिग बॉस ओटीटी सीजन ३ मध्ये अरमान आणि कृतिकाचं वागणं अनेकांना खटकतंय. त्यामुळे ही जोडी पुढील भागात कसा परफॉर्मन्स देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Payal Malik
Armaan Malik: प्रसिद्ध गायक अरमान मलिकचा साखरपुडा दणक्यात! फोटो व्हायरल लग्नाची तारीखही ठरली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com