आशा पारेख आणि शिवाजी साटम यांना जीवनगौरव पुरस्कार ! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली घोषणा

Sudhir Mungantiwar announced Lifetime achievement award to Asha Parekh and Shivaji Satam : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Shivaji Satam and Asha Parekh
Shivaji Satam and Asha ParekhEsakal
Updated on

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनेक पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २ ० २ ३ या वर्षांकरिता जाहीर केला आणि ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना २ ० २ ३ या वर्षाकरिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार येणार असल्याचं जाहीर केलं.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. "चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करत आहोत. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करत आहोत. या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा." असं ट्विट त्यांनी केलं.

स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रु.10 लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असं आहे तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रु.10 लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असं आहे. याबरोबरच स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ करिता जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. रु.६ लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ करिता लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ६ लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हे पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता, NSCI डोम, वरळी मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.