Ashvini Bhave : "विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा" ; विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी झाल्या भावूक

Ashvini Bhave : "विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा" ; विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी झाल्या भावूक

Ashivini Bhave shared memory of Late actor Vikram Gokhale : अभिनेत्री अश्विनी भावे यांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांची खास आठवण शेअर केली.
Published on

Ashvini Bhave Interview : अभिनेत्री अश्विनी भावे घरत गणपती या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच काळाने पुन्हा एकदा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये त्या बिझी असून एका मुलाखतीत त्यांनी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांची एक खास आठवण सांगितली. यावेळी विक्रम यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

इट्स मज्जा या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अश्विनी यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यावेळी त्यांनी विक्रम गोखलेंबाबतची एक आठवण त्यांनी शेअर केली. त्या म्हणाल्या,"विक्रम हा मला त्याची मानसकन्या मानायचा. तो खूप ग्रेट अभिनेता होता. मी कायमच त्याला अरे तुरेच म्हणायचे. तो मोठा अभिनेता असला तरीही माझं आणि त्याचं नातही तसं होतं. 'वजीर' हा सिनेमा करायला नकार दिला होता पण तो मला भेटायला आला आणि त्याने मला तयार केलं कि तो सिनेमा मी करावा. त्या सिनेमात एक सीन होता जो त्या सिनेमाचा दिग्दर्शक मला जवळपास चार तास समजावत होता आणि तो सीन मी फक्त दीड मिनिटांचा होता. चार तासाचा दिग्दर्शक जो सीन मला समजवतोय तो फक्त दीड मिनिटांचाच आहे हे मला कळल्यावर मला राग आला. मी खूप चिडचिड केली. तेव्हा विक्रमने मला काय झालं विचारलं ? त्याला मी सगळं सांगितलं. त्याने मला बसवलं आणि आम्ही तो सीन सात वेळा वाचला आणि आठव्यांदा वाचताना मला तो सीन जमला."

पुढे ती म्हणाली,"विक्रम हा असा अभिनेता आहे ज्यांच्यासमोर कितीही ग्रेट अभिनेते आले तरीही त्याने त्याचा आत्मविश्वास सोडला नाही. तो माझा खूप चांगला मित्र होता. आम्ही खूप चांगलं काम एकत्र केलं." हे सगळं सांगताना अश्विनी यांना अश्रू अनावर झाले.

Ashvini Bhave : "विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा" ; विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी झाल्या भावूक
Ashvini bhave: काहीतरी नवं येतंय! अश्विनी भावे-अजिंक्य देव 25 वर्षांनी एकत्र..

अश्विनी यांचा घरत गणपती २६ जुलै २०२४ ला रिलीज होतोय. या सिनेमात भूषण, निकिता दत्ता यांच्याबरोबर अनेक दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Ashvini Bhave : "विक्रम मला त्याची मानसकन्या मानायचा" ; विक्रम गोखलेंच्या आठवणीत अश्विनी झाल्या भावूक
Gharat Ganpati: माणसांमधील खरी संस्कृती टिपण्याचा प्रयत्न म्हणजे 'घरत गणपती', दिग्दर्शकाने उलगडला चित्रपटाचा प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com