आसामी अभिनेत्री, कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर सुमी बोरा आणि तिचा पती तार्किक बोरा यांना गुरुवारी अटक करण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात ते स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ला हवे होते.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एसटीएफने दोघांनाही दिब्रुगडमध्ये ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी 22 वर्षीय विशाल फुकन याच्या अटकेनंतर दाम्पत्य आणि इतर चार जणांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. यानंतर या सर्वांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.