Aye Haye Oye Hoye Trending Song: सोशल मीडियावर विविध गाणी ट्रेंड होत असतात. त्यातील काही गाणी हटके असतात. सध्या पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान यांचे 'आये हाय ओये होये' हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही नेटकरी या गाण्याला 'क्रिंज' म्हणत आहेत तर काही जण या गाण्याची थट्टा करत आहेत. अशातच आता या गाण्याचे ओरिजन व्हर्जन देखील व्हायरल होत आहे. 'आये हाय ओये होये' गाण्याच्या ओरिजन व्हर्जनचं अनेकजण कौतुक करत आहेत.
गायक चाहत फतेह अली खान यांच्या 'आये हाय ओये होये' या गाण्याला अनेकजण ट्रोल करत आहेत. तर काही जण या गाण्यावरील रिल्स शेअर करत आहेत. चाहत फतेह अली खान यांच्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वजदन राव रंगारसोबत गाताना दिसत आहेत. एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या या म्युझिक व्हिडिओला यूट्यूबवर 1.2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
चाहत फतेह अली खान यांच्या 'आये हाय ओये होये' या गाण्याचे लिरिक्स हे ओरिजनल नाहीयेत. सध्या ट्रेंडिंग होत असणारे चाहत फतेह अली खान यांचे हे गाणे 1973 मध्ये रिलीज झालेल्या 'बनारसी ठग' या पाकिस्तानी चित्रपटमधील 'बदो बदी' या गाण्याचे रिक्रिएशन आहे. मलिका-ए-तरन्नुम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी गायिका नूर जहाँ यांनी 'बनारसी ठग' या चित्रपटातील गाणं गायलं आहे. 'बदो बदी' हे गाणं ऐकल्यानंतर अनेक नेटकरी या गाण्याची तुलना चाहत फतेह अली खान यांच्या गाण्यासोबत करत आहेत.
'बनारसी ठग' चित्रपटातील 'बदो बदी' हे गाणं चाहत फतेह अली खान यांच्या 'आये हाय ओये होये' या गाण्यापेक्षा चांगलं आहे, असं अनेक नेटकऱ्यांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.