Bollywood Entertainment News : कपूर घराणं बॉलिवूड मधील लोकप्रिय घराणं. या घरातील अंतर्गत वाद कधी बाहेर आले नाहीत. एकेकाळी नीतू कपूर आणि बबिता यांच्यातही टोकाचे वाद झाले होते. त्यामुळे या दोघी एकमेकींशी बोलत नव्हत्या तर करिष्माच्या लग्नात रणबीर, रिद्धिमा आणि नीतू यांची गैरहजेरी खूप काही बोलणारी होती. पण बबिता यांचं फक्त नीतू यांच्याशीच नाही तर त्यांची चुलत बहीण साधना यांच्याशीही टोकाचं भांडण झालं होतं. त्यांच्यात झालेले गैरसमज इतके गंभीर होते कि त्या अखेरपर्यंत एकमेकींशी बोलल्या नाहीत.